शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

एक मधमाशी असते ७ हजार फुलांच्या संपर्कात; आग्यामोहळ असले तरी त्यांना मारू नका

By साहेबराव हिवराळे | Updated: January 7, 2025 20:13 IST

निसर्ग चक्र बिघडते, परागीकरणाचे नैसर्गिक काम थांबते, फळपिकाच्या उत्पादनांत होतेय घट

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा औद्योगिक वसाहत, वाळूज, बिडकीन आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांमध्ये विषारी फवारणीमुळे आग्यामोहळ नष्ट होऊन हजारो मधमाशांचा सडा पडत आहे. पण, यामुळे परागीकरणाचे नैसर्गिक काम थांबून फळपिकाच्या उत्पादनांत घट होत आहे.

या मधमाशांमुळे शेतातील पिके बहरास येऊन त्यामार्फत नैसर्गिकरीत्या परागीकरणाची प्रक्रिया होते. परागीकरणाने फळपिकाच्या उत्पादनांत वाढ होते. परंतु, काही कंपन्यांमध्ये आणि नागरी वसाहतीमध्ये सर्रास त्यांच्यावर विषारी द्रावणाने फवारणी करून मारले जाते. यामुळे वातावरणातील संतुलन बिघडून फळे, फुले, शेतीचे मोठे नुकसान होत आहे, हे मानवाने समजून घेतले पाहिजे.

कायद्याने गुन्हाॲनिमल ॲक्ट १९७२ नुसार असे करणे कायद्याने गुन्हा असून, असे करणाऱ्या व्यक्तीवर किंवा खासगी कंपन्या व त्यांचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे संबंधित वनसंरक्षक प्रमोदचंद लकरा, उप वनसंरक्षक सुवर्णा माने, सहा. वनसंरक्षक आशा चव्हाण. वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांनी सांगितले.

मोहळाच्या माशा सुरक्षितपणे काढणारा चमू बोलवा...असे मोहळ आपल्या घर किंवा कंपनी परिसरात आढळल्यास प्राणी मित्र/ ॲनिमल रिस्क्यू सर्व्हिसेस या सेवा देणाऱ्या व्यक्तीकडून सुरक्षितपणे काढून घ्यावे, असे आवाहन वन्यजीव मानद डॉ. किशोर पाठक यांनी केले आहे.

परागीकरणात मधमाशी महत्वाचीच...शेतकीदृष्ट्या मधमाशीही महत्त्वाचीच असून, फळपीक अन् फुलावरील परागीकरण, त्याचबरोबर मध मिळविणे असे नित्याचेच काम ती करीत असते. एक माशी जवळपास ७ हजार फुलांच्या संपर्कात येते. ती मारून टाकणे योग्य नाही. ती सुरक्षितपणे हलविण्यासाठी पथके असून, त्यांना कळवावे.- प्रा.भालचंद्र वायकर, मधुमक्षिकापालन तज्ज्ञ.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी