शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीत ७ एकरमध्ये उभारणार २०० बेडचे विमा रुग्णालय

By बापू सोळुंके | Updated: June 15, 2023 20:16 IST

तसेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये १०० खाटांचे विमा रुग्णालय उभारण्यास मंजूरी मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्याेगिक वसाहतीमध्ये २०० खाटाचे तर शेंद्रा एमआयडीसीमध्ये १०० खाटाचे राज्य कामागर विमा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. वाळूज येथील रुग्णालयासाठी ७ एकर जागा उपलब्ध करण्यात आली असून दोन्ही रुग्णालयाच्या निमित्ताने येथे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे पत्रकारांना दिली.

येथील वाळूज औद्याेगिक वसाहतीमध्ये सुमारे साडेचार हजार लहान मोठे उद्योग आहेत. या आद्योगिक वसाहतीमध्ये  सुमारे दोन ते अडिच लाख कामगार कार्यरत आहे. याकामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना राज्य कामगार विमा रुग्णालयात मोफत उपचार घेण्यासाठी वाळूज वसाहतीमध्ये छोटे क्लिनिक आहे. मात्र रुग्णालयात जेव्हा ॲडमिट करून उपचार घ्यायचे असेल तेव्हा  त्यांना चिकलठाणा येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात यावे लागते. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील विमा संरक्षित कामगारांची संख्या अधिक असल्याने वाळूज येथेच राज्य कामगार विमा रुग्णालय व्हावे, अशी अनेक वर्षापासून कामगार संघटना, उद्योजक संघटनांची मागणी होती. या मागणीची दखल घेत वाळूज येथे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला. 

याविषयी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी पत्रकारांना सांगितले की, वाळूज आणि शेंद्रा येथे राज्य कामगार विमा रुग्णालयाची जागा निश्चित करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यायलात बैठक झाली. या बैठकीला आ. प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, महापालिकेचे प्रशासक जी.श्रीकांत,राज्य कामगार महामंडळाचे प्रमुख साहू आणि मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या रुग्णालयासाठी  वाळूजमध्ये ७ एकर जागा निश्चित झाली आहे.  वाळूज मधील हे २०० बेडचे रुग्णालय ५०० बेडचे करण्यासाठी प्रयत्न केले जाईल आणि त्यासाठी २० एकर जागा उपलब्ध करण्यात येईल. 

शेंद्रा एमआयडीसीमध्ये १०० खाटाचे रुग्णालयशेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये १०० खाटांचे विमा रुग्णालय उभारण्यास मंजूरी मिळाली आहे. या रुग्णालयाची जागा निश्चित करण्यासाठी ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यBhagwat Karadडॉ. भागवत