लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : शरद सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या ७१ उमेदवारी अर्जांपैकी ९ उमेदवारी अर्ज मंगळवारी झालेल्या छाननीत अवैध ठरविण्यात आले. उपविभागिय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने आदींच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी तहसील कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. २४ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होत आहे.वैध ठरलेले उमेदवारऊस उत्पादक मतदार संघनवगाव गट- लाला सोनवणे, विष्णू साबळे, सुरेश दुबाले, विष्णू नवथर, सुरेश चौधरी, डॉ. गुलदाद पठाण, बबन गवांदे, बशीर पठाण.टाकळी अंबड गट - दिलीप लांडगे, श्रीकृष्ण तांबे, शिवदास नरके, संपत गांगले, रावसाहेब घावट, रामराम नरके.विहामांडवा गट - चंद्रकांत घोडके, मुकेश भताने, भगवान पन्हाळकर, सखाराम नांदरे, सुदाम येवले, महावीर काला, लहू पा. डुकरे, ज्ञानोबा घोडके, संजय गाभूड.चौंढाळा गट - डॉ. रमेश बढे, नारायण पठाडे, भास्कर वाघ, राजेंद्र भांड, माणिक थोरे, सुभाष गोजरे, नंदू पठाडे, भाऊसाहेब हजारे, उदयसिंह सोहळे.कडेठाण गट - विजयसिंह तवार, विठ्ठल गोरे, बाबुराव तवार, भारत तवार, राजू भुमरे, सुभाष चावरे, गंगाधर निर्मळ, संदीपान भुमरे.सहकारी संस्था मतदारसंघ - निरंक.महिला राखीव मतदार संघ -कौशल्या नांदरे, कुसुम गोरे, द्वारकाबाई काकडे, नाहेदा गुलदाद पठाण, वर्षाताई पांडुरंग थोटे, सुमन जाधव, पुष्पा करताडे, सुभद्रा डुकरे.अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ - छबू गंगावणे, कल्याण धायकर.इतर मागासवर्गीय प्रतिनिधी -वैद्य दामोधर कोंडिबा, सोमनाथ परदेशी.विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- अनिल चंद्रकांत घोडके, डॉ. रमेश बढे, मुकेश भताणे, शेख महेबूब सालार पटेल, तात्यासाहेब भावले, रामकिसन भावले.
७१ पैैकी ९ अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:54 IST