लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील वर्षी पाथरी शहरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केला असून चोरी गेलेला ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी परत करण्यात आला.पाथरी शहरात मागील वर्षी गजानन प्रभाकर डहाळे यांच्या घरी चोरी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या हस्ते फिर्यादी गजानन प्रभाकर डहाळे यांना हा मुद्देमाल परत करण्यात आला. दीड किलो वजनाचे चांदीचे जोड, १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर असा ऐवज होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गावंडे, कालापाड, उमेश बारहाते, सम्राट कोरडे आदींची उपस्थिती होती.
९५ हजारांचा मुद्देमाल फिर्यादीस केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:54 IST