शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आचारसंहिते लागल्यानंतर मराठवाड्यात ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:58 IST

प्रचारादरम्यान शेतक-यांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत,

ठळक मुद्देआरोप प्रत्यारोपात नेते व्यस्त : राजकीय रणधुमाळीत राजकीय पक्ष विसरले पोशिंद्याला

- विकास राऊत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मराठवाड्यात ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणुकीच्या प्रचारातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळात जगाच्या पोशिंद्याचा सर्वांना विसर पडल्याचे दिसत आहे. मराठवाडा विभागातील भीषण दुष्काळ, २०१२ पासून आजवर नापिकीचा होत असलेला सामना आणि सावकारी पाशात अडकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याची त्यासाठी कर्जमाफीपासून ते पेन्शन देण्यापर्यंत राजकीय पक्ष आश्वासने देत असताना प्रचारादरम्यान शेतकºयांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत, असे चित्र आहे.

१ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत दिली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत. १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

औरंगाबादमध्ये २५, जालन्यातील २१, परभणीती १७, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये २९, बीडमधील ५२, लातूरमधील २५, उस्मानाबादमधील ३९ शेतकºयांनी आजवर आत्महत्या केली आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा आकडा मोठा आहे.महिना              आत्महत्याजानेवारी                 ६२फेबु्रवारी                ६७मार्च                       ६९एप्रिल                    २२एकूण                  २२०रणधुमाळीत शेतक-यांचा विसरकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले की, राजकीय रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. मुळ मुद्यांपासून राजकारण भरकटले आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे. जाती-धर्म आणि एकमेकांवर आरोप करणारी भाषणे निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहेत. प्रचाराचा पहिला आणि दुसरा टप्पा संपला तरीही शेतकºयांच्या धोरणांवर उपायात्मक चर्चा होत नाहीत. शेतक-यांची क्रयशक्ती संपली असून पर्यावरण, पाणी-चाराटंचाईमुळे ते हताश आहेत. धोरण, नियोजन करण्याऐवजी दोषारोप करणारे राजकारण सुरू आहे. राजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत.रोजच पुलवामा होत आहेराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतदेखील ते शेतकºयांविषयी बोलत नाहीत, असा आरोप शेतकरी पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019farmer suicideशेतकरी आत्महत्या