शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

९१ कोटी रुपये दिले; कचऱ्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:50 IST

शहरात मागील १६ महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. शहरात जमा होणारा कचरा चार वेगवेगळ्या भागांत नेऊन टाकण्याचे काम मनपा प्रशासन मागील वर्षभरापासून करीत आहे. चिकलठाणा वगळता कुठेच कचºयावर प्रक्रिया होत नाही. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचे भरघोस अनुदान दिले होते.

ठळक मुद्देशासनाकडून विचारणा : आयुक्त आज खुलासा करणार

औरंगाबाद : शहरात मागील १६ महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. शहरात जमा होणारा कचरा चार वेगवेगळ्या भागांत नेऊन टाकण्याचे काम मनपा प्रशासन मागील वर्षभरापासून करीत आहे. चिकलठाणा वगळता कुठेच कचºयावर प्रक्रिया होत नाही. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचे भरघोस अनुदान दिले होते. अनुदान मिळाल्यानंतरही प्रशासनाने नेमके काय केले? असा प्रश्न नगरविकास विभागाने उपस्थित केला आहे. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर मनपा आयुक्त बुधवारी खुलासा करणार आहेत.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी शहरात कचरा कोंडीला सुरुवात झाली. शहरात रस्त्यांवर अक्षरश: कचºयाचे डोंगर साचले होते. या कचरा कोंडीत राज्य शासनाने महापालिकेला चांगलीच साथ दिली. नगरविकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्वत: औरंगाबादेत येऊन कचरा प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर लगेच शासनाने महापालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ९१ कोटी रुपयांचे अनुदान दिले. त्यानंतर महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. चिकलठाणा येथील प्रकल्प दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात महापालिकेला यश आहे. इतर प्रकल्प अद्याप रखडलेले आहेत, तर हर्सूलची निविदादेखील होऊ शकलेली नाही. १६ महिने उलटल्यानंतर राज्य शासनाने शहरातील कचºयाची नेमकी काय अवस्था आहे? अशी विचारणा महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे नगर विकास विभागात असलेल्या मनीषा म्हैसकर आता प्रधान सचिव आहेत. त्यांच्याकडे आयुक्त गुरुवारी सादरीकरण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न