लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वेतनवाढीच्या मागणीसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील सुमारे ८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प राहिले. तर शहरातील ७० टक्के एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाल्याने याचा फटका व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्यांना बसला. महिनाअखेरचे सर्व आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी संप पुकारला आहे. त्यास शहरात पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा युनियन्सच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बुधवारी शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्व शाखा बंद होत्या. सिडकोतील एसबीआयच्या शाखेत ज्येष्ठ नागरिकांच्या सकाळी रांगा दिसून आल्या. अनेक ज्येष्ठांना दोन दिवस बँक बंद आहे, याची कल्पना नव्हती. विविध योजनांच्या लाभार्थी ज्येष्ठ महिलाही तासन्तास बँकेसमोर बसून असल्याचे दिसून आले. दोन दिवस संप असल्याने एटीएममध्ये मुबलक रक्कम भरणे आवश्यक होते. पण निष्काळजीपणामुळे संबंधित एजन्सीने रक्कम भरलीच नाही. त्यामुळे नोटाअभावी एटीएम खाली होते. नागरिक एका एटीएममधून दुसºया एटीएमकडे धाव घेताना दिसून आले. बँक बंद असल्याने अनेकांची फजिती झाली.बँक कर्मचाºयांची जोरदार निदर्शनेसंपाच्या पहिल्या दिवशी बँक कर्मचाºयांनी टाऊन सेंटर येथील महाराष्ट्र बँकेसमोर सकाळी जोरदार निदर्शने केली. लवकरात लवकर पगारवाढीचा करार करण्यात यावा, पगारात पुरेशी वाढ देण्यात यावी. इतर सेवा, शर्तीत योग्य त्या सुधारणा घडवून आणाव्यात आदी मागण्यांचा मान्यवरांनी भाषणात उल्लेख केला. राजेंद्र मुंगीकर, उत्तम भाकरे, महेश गोसावी, गणेश पैठणे, हिंद प्रकाश जयस्वाल, सुनील शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रवी धामणगावकर यांनी केले.
औरंगाबादेत ८०० कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:52 IST
वेतनवाढीच्या मागणीसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील सुमारे ८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प राहिले.
औरंगाबादेत ८०० कोटींचे व्यवहार ठप्प
ठळक मुद्देबँक कर्मचारी संपावर : व्यापारी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल, ७० टक्के एटीएममध्ये खडखडाट