शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

८० हजार रुपये घेऊन दोन वधूंचे साथीदारांच्या मदतीने पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:28 IST

८० हजार रुपये घेऊन विवाह करण्यासाठी तयार असलेल्या नियोजित वधूंनी साथीदारांच्या मदतीने फिल्मीस्टाईल धूम ठोकली. ही घटना बीड बायपासवर रात्री सात वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देहद्दीच्या वादात अडकले पोलीस : बीड बायपासवरील घटना

औरंगाबाद : ८० हजार रुपये घेऊन विवाह करण्यासाठी तयार असलेल्या नियोजित वधूंनी साथीदारांच्या मदतीने फिल्मीस्टाईल धूम ठोकली. ही घटना बीड बायपासवर रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर हद्दीच्या वादात चिकलठाणा, मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलीस अडकून पडले.प्राप्त माहिती अशी की, राजस्थानमध्ये मुलींची संख्या कमी असल्याने तेथील विवाहेच्छुक पुरुष मंडळी पैसे देऊन मध्यस्थांमार्फत लग्न करण्यास तयार असतात. भिलवाडा (राजस्थान) येथील दोन जणांसोबत विवाह करण्यासाठी दोन महिलांनी मध्यस्थामार्फत तयारी दर्शविली होती. त्या नियोजित वधूंना वरांकडून ८० हजार रुपये देण्यात आले होते. विवाहासाठी त्या भिलवाडा येथे गेल्या. मात्र, वराकडील मंडळींनी हैदराबादेत विवाह करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे ते सर्वजण भिलवाडा येथून टेम्पो ट्रॅव्हल्सने औरंगाबादमार्गे हैदराबादला जात होते. यावेळी टेम्पोत नियोजित दोन वर आणि दोन वधू, एक महिला आणि टेम्पोचालक एवढीच मंडळी होती. नियोजित वधूंपैकी एक सिडको एन-६ येथील, तर दुसरी अहमदनगर येथील रहिवासी आहे. टेम्पो ट्रॅव्हल बीड बायपासवर असताना नियोजित वधूंच्या साथीदारांनी त्यांचा टेम्पो अडविला. टेम्पो थांबताच टेम्पोतील नियोजित वधू खाली उतरल्या आणि नियोजित वरांना त्यांनी धक्काबुक्की करीत त्या दोघींनी त्यांच्यासह तेथून धूम ठोक ली. त्यानंतर काही अंतरावर पुढे गेल्यानंतर टेम्पोचालकाने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तेव्हा हा गुन्हा शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याचे त्यांना समजले. त्यांनी याप्रकरणी पुंडलिकनगर अथवा मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार करण्याचे त्यांना सांगितले. पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळ कोणाच्या हद्दीत आहे, याचा शोध घेत होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद कोणत्याही ठाण्यात झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस