शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बदनामीची धमकी देत अभियंत्याला मागितली ८ लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:00 IST

माहिती अधिकारात माहिती घेऊन रचला डाव 

ठळक मुद्दे त्रिकुटाला सिडको पोलिसांनी सापळा रचून खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. माहिती अधिकारात माहिती घेऊन बदनामीची धमकी

औरंगाबाद : माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवून महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याला बदनामीची धमकी देऊन ८ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या त्रिकुटाला सिडको पोलिसांनी सापळा रचून खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सिडको एन-५ मधील मैदानावर रविवारी दुपारी करण्यात आली. 

उदय अरुणराव पालकर (४६, श्रीयोग अपार्टमेंट, सिडको एन-५), भानुदास शंकर मोरे (३१, रा. जयभवानीनगर) आणि अमोल सांडू साळवे (३५, रा. गुलमोहर कॉलनी, सिडको) अशी अटक  आरोपींची नावे आहेत. आरोपी उदय पालकरने माहिती अधिकार कायद्यांतर्गत महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची वैयक्तिक आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती मागितली होती. त्यानुसार त्याला सर्व माहिती कार्यालयातर्फे पुरविण्यात आली. १९ जुलै रोजी गणेशकर हे त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना आरोपी उदय पालकर त्यांना जाऊन भेटला आणि म्हणाला की, तुमची आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती मागवून तुम्हाला फरक पडत नाही. ‘आमचे काय चुकले,’ असे गणेशकर यांनी त्यास विचारले असता तो म्हणाला की, मला तुमच्यासोबत कामाचे बोलायचे आहे; पण तुमच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला. गणेशकर यांनी बाहेर येण्यास असमर्थता दर्शविली आणि कार्यालयातील लिपिक विनोद श्याम सोनवणे यांच्यासोबत बोला, असे सांगून सोनवणे यांना त्याच्यासोबत पाठविले.

सोनवणे यांना तो सिडको नाट्यगृहाच्या रस्त्यावर घेऊन गेला. तेथे उदयचा एक मित्र थांबलेला होता. त्या दोघांनी सोनवणे यांना सांगितले की, गणेशकर आणि तुमच्या कार्यालयातील माहिती मागविली आहे. तुम्ही २० जुलै रोजी दुपारी ४ वाजता ८ लाख रुपये रोख आणून दिल्यास आम्ही तुमची बदनामी करणार नाही. शिवाय ही रक्कम तुम्हीच आणून द्यावी, अशी अटही त्यांनी सोनवणे यांना घातली. सोनवणे यांनी आरोपीसोबत झालेल्या संवादाची माहिती गणेशकर यांना दिली. गणेशकर यांनी सिडको पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब अहेर, कर्मचारी नरसिंग पवार, राजेश बनकर, डोंगरे, सुरेश भिसे, गाढे, रत्नपारखी यांनी पंचासमक्ष सिडकोतील एका हॉटेलसमोरील मनपाच्या मैदानात सोनवणे यांच्यासोबत पंच पाठवून खंडणीची रक्कम पाठविली. आरोपी उदय आणि त्याचे साथीदार भानुदास मोरे, अमोल साळवे यांच्यासह तेथे आले. सोनवणे यांच्याकडून खंडणीची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना पकडले.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस