शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाची ८ दरवाजे उघडले; गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेकने विसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 19:34 IST

दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून विसर्ग सुरु

ठळक मुद्देनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंदधरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग

पैठण (औरंगाबाद ): जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात सांडव्यातून ४१९२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात १५९० विसर्ग सुरू असल्याने धरणातून गोदावरी पात्रात एकत्रित ५७८१ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग होत असल्याने गोदावरी गतीने वहाती झाली आहे. गोदावरीतून वाहते झालेले पाणी आज जालना जिल्ह्यात पोहचले असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचा जलसाठा १५ ऑगस्ट रोजी ९२% च्या जवळपास पोहचल्याने जायकवाडी धरणाच्या सांडव्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन जायकवाडी प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उचलून गोदावरीत पहिला विसर्ग केला.या वेळी गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक ए पी कोहिरकर, मुख्य अभियंता दिलीप तवार, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंया अशोक चव्हाण, बुध्दभूषण दाभाडे, संदीप राठोड, आर ई चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधने, खराडकर आदींनी पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

जायकवाडी धरणातून होणारा विसर्गजायकवाडी धरणाचे दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक असा मिळून ४१९२ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती नंतर विमोचिकेतून १५८९ क्युसेक असा मिळून गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून १४०० क्युसेक व उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या जलसाठ्यातून ८०८० क्युसेक एकूण विसर्ग सर्व मार्गाने होत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील बंधारे भरणार आहेत. शिवाय नदीकाठावरील गावांची तहान भागणार असून लाभक्षेत्रातील विहीरींची पाणीपातळी वाढणार आहे. गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले सर्व बंधाऱ्याचे दरवाजे उघडे करून खालील बंधाऱ्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.

आवक बंदनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंद करण्यात आल्याने गुरुवारी धरणात येणारी आवक निरंक झाली. मात्र धरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात येऊन धरणात आगामी काळातील संभाव्य पूर नियंत्रित करण्यासाठी पॉकेट तयार करण्यात येत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई असल्याने तेथील पाणीटंचाईचे निवारण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीWaterपाणीAurangabadऔरंगाबाद