शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

७८ महाविद्यालयांच्या अनुदानाचा प्रश्न काही सुटेना; २४ वर्षांपासून प्राध्यापक विनावेतन राबतात

By राम शिनगारे | Updated: March 6, 2025 13:58 IST

अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत २४ वर्षांपासून प्राध्यापक विनावेतन; ५ वेळा झाल्या फक्त तपासण्याच

छत्रपती संभाजीनगर : राज्यात २००१ पूर्वीची ७८ वरिष्ठ महाविद्यालये, २४ तुकड्या आणि १४ विषयांना अनुदान देण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा तपासण्या करण्यात आल्या. मुंबईतील आझाद मैदानात २५० दिवस बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना आश्वासनावर बोळवण करण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले. २४ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले काही प्राध्यापक विनावेतनच निवृत्तही झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

राज्यात कायम विनाअनुदानित धोरण २४ नोव्हेंबर २००१ रोजी लागू करण्यात आले. हे धोरण लागू होण्यापूर्वीच शासनाने ७८ महाविद्यालयांना विनाअनुदानित म्हणून मान्यता दिलेली होती. त्यामुळे ही महाविद्यालये अनुदानास पात्र ठरतात. या महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत तब्बल २४ वर्षे काढली. मुंबईतील आझाद मैदानात ६ फेब्रुवारी ते १३ ऑक्टोबर २०२४ असे २५० दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले. तेव्हा शासन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेनुसार विभागीय सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करून अनुदान देण्याविषयीचा अहवाल संचालकांना पाठविण्यात आला. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावर अनुदानाच्या प्रतीक्षेतील प्राध्यापकांना सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच मिळाली.

पाच वेळा तपासण्याराज्यातील ७८ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा तपासण्या केल्या आहेत. २०१० मध्ये पहिल्यांदा ७८ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी प्रस्ताव तयार केला. तेव्हा तपासणी केली. त्यानंतर महायुती सरकारने २०१४, २०१८ मध्ये पुन्हा तपासणी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०२१ साली तपासणी केली. या तपासणीनंतर पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकारने २०२४ मध्ये तपासणी केली. मात्र अद्याप अनुदान काही दिलेले नाही.

अर्थमंत्रालयाची नकारात्मक भूमिकाया ७८ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने शिफारस केलेली आहे. मात्र, प्रत्येक वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विभाग असलेल्या अर्थमंत्रालयाने नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा प्रश्न निकाली निघत नसल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात दाद मागूराज्य शासनाने ७८ महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देणे नितांत गरजेचे आहे. २४ वर्षांपासून अनुदानासाठी लढा देत आहोत; पण शासनाकडून फक्त आश्वासन मिळते. प्रश्न निकाली काढला जात नाही. महिनाभरात तिढा न सुटल्यास उच्च न्यायालयात दाद मागू.- डॉ. भाऊसाहेब झिरपे, अध्यक्ष, राज्य कृती समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकार