शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नूतनीकरणाअभावी ७५ हजार मजूर अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:56 IST

एक लाखाच्या जवळपास मजुरांची नोंदणी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे आहे.

ठळक मुद्देपाल्यांच्या शिक्षणासह जगण्यासाठी मजुरांची धडपड

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये अनेक मजुरांच्या हातचे काम गेले. अनेकांचा गावाकडे बस्तान हलविण्याचा प्रयत्न फसला. नूतनीकरण न केल्यामुळे  शासनाच्या ५ हजार रुपयांच्या कोविड अनुदानापासून जवळपास ७५ हजार मजुरांना वंचित राहावे लागले.

लॉकडाऊनमध्ये मजुरांना मदतीसाठी विविध संस्था, संघटना सरसावल्या, पण त्यानंतर कोरोना रुग्ण वाढत गेल्याने घर कामगार महिलांना कामावरून घरीच अर्धपोटी राहावे लागले. शासनाकडून नोंदणीकृत मजुरांना पाच हजारांची कोविड मदत घोषित केली. त्यातील दोन हजारांचा टप्पा मोजक्याच मजुरांच्या खात्यावर जमा झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात तीन हजारांचे अनुदान येत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मजुरांना सांगितले जात आहे. 

एक लाखाच्या जवळपास मजुरांची नोंदणी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे आहे. त्यापैकी पंचवीस हजार कामगारांचेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे. इतर मजूर मात्र या योजनेपासून वंचित आहेत. त्या कामगारांची नोंदणी होणार की नाही याविषयी मजुरांत संभ्रम आहे. कारण मजूर नाक्यावर मजुराची अनलॉकनंतर हळूहळू गर्दी होऊ लागली आहे, परंतु त्यांच्या हाताला काम नाही, खोली भाडे देण्यासाठी पैसा नाही. शासनाने घोषित केलेल्या कोविड अनुदानातून मजुरांच्या खात्यात दुसरा टप्पा कधी येईल, याकडे मजुरांचे लक्ष लागले आहे. 

नूतनीकरणाची अट रद्द करून निधी द्यावाकोविड अनुदानापासून वंचित असणाऱ्या मजुरांचे रखडलेले नूतनीकरण आवश्यक करू नये. शासनाने दिलेले अनुदान हे मजुराच्या खात्यावर सरसकट पाठवावे. अनलॉकमध्ये नुकतेच जेमतेम काम मिळत आहे. - मधुकर खिल्लारे (कामगार नेता) 

मजुरांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती त्वरित द्यावीनोंदणीकृत मजुरांच्या पाल्यांना विविध स्तरावर शिक्षणासाठी पुस्तक व साहित्य खरेदीसाठी मिळणारी शिष्यवृत्ती कोविडमध्ये रखडलेली आहे. जुन्याच नोंदणीकृत लाभार्थींच्या खात्यावर ती वर्ग होत असल्याचे सांगितले जाते, परंतु त्यापासून अनेक कामगारांचे पाल्ये वंचित आहेत. - सुरेश वाकडे (कामगार नेता) 

शासनाची मदत सुरू ...लॉकडाऊनच्या काळात कोविड अनुदान शासनाने देणे सुरू केलेले आहे. जे वंचित असतील त्यांचीही नोंदणी करून घेत त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. वरिष्ठ त्यावर विचार करतील, शिष्यवृत्तीचे टप्पे असून, सध्या गतवर्षीचे वाटप होत आहे.- श्रीहरी मुंढे (कामगार अधिकारी) 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याfundsनिधी