शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

‘स्पॉट अ‍ॅडमिशन’नंतरही ७५ टक्के जागा रिक्तच

By admin | Updated: August 17, 2015 00:08 IST

परभणी : डी़एल़एड्च्या राज्यस्तरीय प्रवेश फेरीत भावी गुरूजींनी पाठ फिरविल्याने संस्थाचालकाच्या आग्रहास्तव जिल्हास्तरावर तीन दिवसीय ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’ फेरी ठेवण्यात आली होती़

परभणी : डी़एल़एड्च्या राज्यस्तरीय प्रवेश फेरीत भावी गुरूजींनी पाठ फिरविल्याने संस्थाचालकाच्या आग्रहास्तव जिल्हास्तरावर तीन दिवसीय ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’ फेरी ठेवण्यात आली होती़ परंतु, या फेरीकडेही भावी गुरूजींनी पाठ फिरविल्याने तब्बल ७५ टक्के जागा रिक्त राहणार आहेत़ त्यामुळे पुन्हा स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी ठेवण्यासाठी संस्थाचालक संचलनालयात ठाण मांडून बसले आहेत़काही वर्षापूर्वी झटपट नोकरी मिळवून देणारा अभ्यासक्रम म्हणून डी़एड्. ला विद्यार्थ्यांची पसंती होती़ त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा होत होती़ तसेच प्रवेशाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने डी़एड्. कॉलेजच्या संखेत भरमसाठ वाढ झाली़ त्यामुळे भावी शिक्षकांची संख्या लाखांच्या घरात गेली़ परंतु, २ मे २०१० नंतर शिक्षक भरतीवर निर्बंध घातल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यानी पाठ फिरवली आहे़ यावर्षी तर जिल्ह्यातील तब्बल ७५ टक्के जागा रिक्त राहणार आहेत.़ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे १ अनुदानित २२ कायम विनाअनुदानित अशी २३ अध्यापक विद्यालये आहेत़ तर एकूण १ हजार ५०० प्रवेश क्षमता आहे़ राज्यस्तरीय प्रवेश फेरीसाठी यावर्षी १ जून ते १५ जून अर्ज विक्री व स्वीकृतीचा कालावधी होता़ यामध्ये केवळ १८५ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी प्रवेश अर्ज दाखल केले होते़ २९ जूनच्या प्रवेश फेरीमधून जिल्ह्यातील ११ विद्यालयांमध्ये ५९ भावी शिक्षकांनी प्रवेश घेतला तर ११ विद्यालयांना एकही भावी शिक्षक मिळाला नव्हता़ त्यामुळे आपली अध्यापक विद्यालये बंद पडतील या भीतीने संस्थाचालकांनी आपले वजन वापरून २२ ते २४ जुलै दरम्यान ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’ ठेवण्यास भाग पाडले़ परंतु, प्रयत्न करूनही अनेक भावी शिक्षक या अभ्यासक्रमाकडे फिरकले नाहीत़ विषेश म्हणजे, अध्यापक विद्यालयातील सर्वच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे टार्गेट दिले होते़ तरही स्पॉट अ‍ॅडमिशन फेरीमध्ये केवळ २२१ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला़ त्यामुळे जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयाची प्रवेश क्षमता जवळपास १ हजार ५०० असताना प्रत्यक्षात मात्र राज्यस्तरीय प्रवेश व स्पॉट अ‍ॅडमिशन फेरीमधील मिळून केवळ २८० जणांनीच प्रवेश घेतला. त्यामुळे १ हजार २२० जागा रिक्त राहणार आहेत़ या प्रवेश फेरीमध्ये प्रत्येक अध्यापक विद्यालयास नावालाच भावी शिक्षक मिळाल्याने प्रत्यक्षात अध्यापन होणार की कागदोपत्री अध्यापक विद्यालये चालणार हे येणारा काळच ठरवणार आहे़ सध्या तरी अजून संस्थाचालकांना विद्यार्थी मिळतील या आशेने पूणे येथील शिक्षण संचलनालयात पून्हा स्पॉट अ‍ॅडमिशन प्रवेश फेरीसाठी कालावधी देण्यात यावा, यासाठी संस्थाचालक तळ ठोकून आहेत़