शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

औरंगाबादच्या कामगारांच्या खिशात  ७५ कोटींचा बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 18:07 IST

औरंगाबादच्या ७५ टक्के उद्योगांनी जवळपास ७५ ते ८० कोटी रुपयांचा बोनस वाटप करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

ठळक मुद्देउर्वरित २५ टक्के उद्योगांचे बोनस वाटप १० तारखेपर्यंतमागील वर्षी येथील उद्योगांनी शंभर कोटींच्या जवळपास कामगारांना बोनस वाटप केला होता.

- विजय सरवदे औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विसकटलेल्या उद्योगांकडून यंदा बोनस मिळेल की नाही, अशी संभ्रमावस्था कामगारांची होती. मात्र, कालपर्यंत औरंगाबादच्या ७५ टक्के उद्योगांनी जवळपास ७५ ते ८० कोटी रुपयांचा बोनस वाटप करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उर्वरित २५ टक्के उद्योग मात्र १० नोव्हेंबरपर्यंत बोनसचे वाटप करतील, अशी अपेक्षा आहे. 

लॉकडाऊनमुळे यंदा उद्योगांचे अर्थचक्र कोलमडले होते. साधारणपणे एप्रिलपासून तब्बल साडेतीन महिने औरंगाबादसह देशभरातील उद्योग ठप्प होते. त्यानंतर शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल केले. त्यानंतर उद्योग पूर्वपदावर आले. देशभरातील बाजारपेठाही उघडल्या. दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडे ऑर्डरचे प्रमाणही वाढले. तेव्हा कुठे उद्योजक व कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. 

मागील वर्षी येथील उद्योगांनी शंभर कोटींच्या जवळपास कामगारांना बोनस वाटप केला होता. यावर्षीही तेवढाच किंवा थोड्याफार फरकाने बोनस वाटप होईल, असा अंदाज कामगार संघटना व उद्योजकांनी व्यक्त केला आहे. या महिन्याच्या ३ तारखेपासून उद्योगांनी बोनस वाटप सुरू केले. काही उद्योगांनी ५५ हजार रुपयांपासून ते १६ हजार रुपयांपर्यंत बोनसची रक्कम वाटप केल्याचे ‘सिटू’ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर व दामोदर मानकापे यांनी सांगितले. 

दोन-तीन दिवसांत खरेदीसाठी उसळेल गर्दीबोनसची रक्कम कामगारांच्या हातात पडली. मात्र, त्या तुलनेत बाजारात सध्यातरी खरेदीसाठी  गर्दी होताना दिसत नाही. शनिवारी आणि रविवारी बाजारपेठेत काही प्रमाणात गर्दी दिसेल. यासंदर्भात काही जाणकारांचे मत असे आहे की, १० तारखेच्या आत सर्वच कामगारांच्या हातात बोनस व वेतन पडेल. प्राप्त पैशाचे नियोजन करून कामगारांची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडेल. दिवाळीच्या सणावर कोरोनाचे सावट दिसणार नाही. 

व्यापारी देणार कर्मचाऱ्यांना ५० कोटींचा बोनसशहरात १० हजार व्यापारी त्यांच्याकडील सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहेत. या बोनसरूपातील ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम पुन्हा बाजरात येणार आहे. दरवर्षी केंद्र सरकार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, औद्योगिक वसाहतीत कामगारांना वाटप होणारा बोनस, याचीच चर्चा होत असते. त्यावरून बाजारपेठ किती कोटींची उलाढाल होणार, याचा अंदाज बांधला जात असतो. मात्र, बाजारपेठेतही व्यापारी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना बोनस वाटप करीत असतात. या बोनसची मोठी रक्कम खरेदीच्या निमित्ताने पुन्हा बाजारपेठत येत असते. मात्र, याची चर्चा होत नाही. बाजारपेठ मोठ्या प्रमाणात रोजगार देत असते. शहरात सुमारे १० हजार व्यापारी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ८ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत बोनस देत असतात. या व्यापाऱ्यांकडे प्रत्येकी ५ कर्मचारी, असे ५० हजार कर्मचारी आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना, नोकरांना पगार देणे सुरू केले आहे. सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम बोनसपोटी बाजारात येणार आहे, अशी माहिती प्रफुल्ल मालानी यांनी दिली. 

आहे त्या कर्मचाऱ्यांवरच व्यापाऱ्यांची मदारदरवर्षी दसऱ्याच्या आधी काही कर्मचारी नोकरी सोडून जात असतात, तर कापड बाजारात हंगामी कर्मचाऱ्यांची गरज पडत असते. मात्र, यावेळी कर्मचारी नोकरी सोडून गेले नाहीत. यामुळे दसरा- दिवाळीदरम्यान नवीन नोकर भरतीची गरज पडली नाही. -जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबादfundsनिधी