शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

वर्षाला ७ हजार गर्भवती छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘रेफर’; ४० टक्के अत्यवस्थ

By संतोष हिरेमठ | Updated: May 28, 2025 20:17 IST

घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागात दररोज सरासरी ६० ते ७० प्रसूती होतात. वार्षिक प्रसूतीची संख्या १७ ते २० हजारांदरम्यान असते.

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालय मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. नैसर्गिक प्रसूती म्हटले तर घाटीच, असे म्हटले जाते. दरवर्षी सुमारे ७ हजार गरोदर महिलांना प्रसूतीसाठी सरळ घाटीत ‘रेफर’ केले जात आहे. धक्कादायक म्हणजे यातील ४० टक्के गरोदर महिला अत्यवस्थ घाटीत येतात. आईची पर्वा, बाळाची काळजी न करता ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांतील महिलांना सरळ घाटीत ‘रेफर’ करणे सुरू आहे.

घाटी रुग्णालय हे ‘टर्शरी केअर सेंटर’ म्हणून कार्यरत आहे. घाटीतील प्रसूतिशास्त्र विभागात दररोज सरासरी ६० ते ७० प्रसूती होतात. वार्षिक प्रसूतीची संख्या १७ ते २० हजारांदरम्यान असते. मराठवाडा व लगतच्या भागातील जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, इतर खासगी रुग्णालयांमधून अनेक गर्भवती येथे पाठवल्या जातात. अनेकदा शेजारच्या राज्यांतील महिलाही येतात.

घाटीत गरोदर महिलांच्या ‘रेफर’ची स्थिती- दररोज सुमारे २० ते ३० रेफर- महिन्याला ६०० रेफर- वर्षाला सुमारे ७,२०० रेफर- यापैकी ४० ते ५० टक्के माता अत्यवस्थ दाखल होतात. त्यांना रक्तस्त्राव, फिट, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फुप्फुस विकार, जंतुसंसर्ग अशा जीवघेण्या समस्यांनी ग्रासलेले असते.

घाटीतील प्रसूतींची स्थितीवर्ष- नैसर्गिक प्रसूती- सिझेरिअन प्रसूती२०२४ - १२,१५९-५२७७२०२३- १४,९७७-४४७४

रेफर टाळणे शक्य; पण..घाटीत रेफर होणाऱ्या बऱ्याच महिलांची प्राथमिक व उपजिल्हा रुग्णालयांमध्येच प्रसूती होऊ शकते. परंतु, योग्य प्रशिक्षणाचा अभाव, भीतीमुळे, सुविधा नसल्यामुळे त्यांना ‘घाटीतच उपचार शक्य आहेत’ असे सांगून पाठवले जाते. परिणामी, घाटीवरचा ताण वाढतो आणि खरोखरच अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या उपचारात अडथळा येतो.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी

आरोग्य संस्थांचे बळकटीकरणआरोग्य विभागातर्गत असलेल्या संस्थांचे बळकटीकरण केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रसूती होते. स्पेशालिस्ट डाॅक्टर घेतले जात आहेत. ४०० खाटांचे महिला रुग्णालय सुरू झाल्यानंतर घाटीवरील भार कमी होईल.- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक

अत्यवस्थ व उशिरा रुग्णालयात आल्यास....- उशिरा आलेल्या गरोदर महिलांच्या जिवाला धोका अधिक- बाळाच्या जिवाला धोका- रक्तस्त्राव, फिटवर तत्काळ उपचाराची गरज- आयसीयू खाटांची कमतरता- रक्तपेढीत पुरेसा रक्तसाठा नसणे- वाॅर्डांमध्ये रुग्णसंख्या अधिक आणि जागा अपुरी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीpregnant womanगर्भवती महिला