शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:50 IST

देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.   

औरंगाबाद : देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.  

या तलावाच्या परिक्षेत्रात कुणीही जाऊ नये व त्यासाठी खबरदारी घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने धोकादायक तलावाच्या पाण्यात कोणीही उतरू नये, उतरल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा नोटीसवजा सूचना बोर्ड लावण्यात आला होता. किमान सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर येथील बोर्ड कुणी तरी काढून फेकला असून, उन्हाचा उकाडा जसा वाढत गेला अन् पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. मित्र परिवारासह निघालेल्या युवकांनी पाण्यात उतरून आंघोळ करण्यासाठी उडी मारली. पाण्यात पोहत दूरपर्यंत फेरी मारली अन् अचानक पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून त्याचा शोध स्थानिक नागरिक, अग्निशामक विभागाने घेतला.

ही पहिलीच घटना नाही तर चिकलठाणा पोलिसांच्या नोंदणीनुसार पाण्यात बुडून हा सातवा मृत्यू झाला आहे. हा धोकादायक तलाव असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना असून, येथील बहुतांश नागरिक व मुलेदेखील पाण्यात उतरत नाहीत. तलावातील हजारो टन मुरूम, मातीचा उपसा झाला असल्याने भौगोलिक रचना अत्यंत धोकादायक आहे. पाण्याचा साठा पाहून पाण्यात उतरण्याचा मोह उन्हाळ्यात अनेकांना होतो. तलावाची माहिती नसल्याने धोक्याच्या घटना अर्ध्या डझनाच्या वर घडल्या आहेत. ग्रामपंचायत लक्ष देणारच आहे;परंतु पोलिसांची दिवसातून एकदा तरी गस्त असावी. कारवाईच्या भीतीने तलावात कुणी उतरणार नाही, असे उपसरपंच अमोल तळेकर म्हणाले. 

रहदारीच्या ठिकाणी तार कुंपण हवेदेवळाई रोडवरून जाताना काही अंतरावर तलाव असल्याने पाणी दिसते; परंतु या तलावाला तारेचे कुंपण लावून नोटीस बोर्डाद्वारे पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी अनेक नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

ग्रामपंचायतीला दिल्या सूचनातलावात कोणी उतरू नये, असा बोर्ड पुन्हा लावणार आहोत; परंतु तलाव गांधेली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने त्यांनीदेखील तलाव परिक्षेत्रात कुणीही उतरू नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी खबरदारी घ्यावी, असे चिकलठाणा पोलिसांनी पत्र पाठवून सूचित केले आहे, असे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसरAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस