शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

स्मार्ट बसमधून १८ दिवसांत ६९ हजार नागरिकांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 12:40 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सात  महिन्यांच्या विश्रांतीनंतर ३० बसेस रस्त्यावर धावत आहेत.

ठळक मुद्देकिलोमीटर मागे ६३ रुपये खर्च तर उत्पन्न १८ रुपये आहे.

औरंगाबाद : शहरबस ५ नोव्हेंबरपासून शहरातील रस्त्यांवर धावत आहे. १८ दिवसांत स्मार्ट बसने ९८ हजार ७६४ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. ६९ हजार ३५६ प्रवाशांनी या काळात प्रवास केला असून, १४ लाख २१ हजार रुपये तिकिटापोटी महसूल जमा झाला आहे. एका किलोमीटर मागे ६३ रुपये खर्च येत आहे तर उत्पन्न १८ रुपये आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सात  महिन्यांच्या विश्रांतीनंतर ३० बसेस रस्त्यावर धावत आहेत. प्रमुख नऊ मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली. शहराच्या हद्दीबाहेरील भागातही शहरबस सुरू करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानक ते फुलंब्री तसेच बिडकीन, करमाड, वेरूळ या मार्गावर बस धावत आहेत. तसेच अ‍ॅन्ड्रॉईड-ई-तिकीट मशीनव्दारे तिकीट घेण्याची सुविधा प्रवाशांना देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात आलेल्या शहरबसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

गेल्या १८ दिवसांत स्मार्ट बसने ९८ हजार ७६४ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. ६९ हजार ३५६ प्रवाशांनी या काळात प्रवास केला असून, १४ लाख २१ हजार रुपये तिकिटापोटी महसूल जमा झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले. स्मार्ट सिटीला शहरबस सेवेपोटी मोठा तोटा सहन करावा लागत आहे. एका किलोमीटरमागे ४५ रुपयांची तूट सध्या निर्माण झाली आहे. 

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रयोगशहर तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचविण्याबरोबरच स्मार्ट सिटी बस आता प्रासंगिक करारही करणार आहे. शहर आणि परिसरातील लग्नसमारंभ, खासगी, सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, यात्रा, मेळावे, सहल, प्रेक्षणीय तसेच औद्योगिक स्थळांना भेटी देण्यासाठी सिटी बस भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. प्रवाशांना ६० रुपयांत एक दिवस कुठेही प्रवास करता येईल. पाच दिवसांच्या प्रवास भाड्यांमध्ये सात दिवसांचा, २० दिवसांच्या प्रवास भाड्यांमध्ये ३० दिवसांचा तर ६० दिवसांच्या प्रवास भाडे पासवर ९० दिवसांचा प्रवास करता येणार आहे. बसच्या माहितीसाठी मोबाईल ॲप्लीकेशन, स्मार्ट कार्ड, ई-तिकीट मशीन, बस ट्रॅकिंग सुविधा, प्रवासी माहिती प्रणाली, प्रवाशांना थांबण्यासाठी स्मार्ट बसस्टॉप आदी सेवा विकसित केल्या आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन