शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६९ हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?

By विकास राऊत | Updated: November 13, 2023 16:45 IST

येणाऱ्या काळात मतदार स्थलांतराचा व नवीन मतदार नोंदणीचा आकडा वाढेल.

छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात जिल्ह्यात ६९ हजार ५९० मतदारांची नावे वगळली आहेत. मतदारांची नावे विविध कारणास्तव यादीतून वगळले असून, नव्याने ३१ हजार ९८३ मतदारांची भर पडली आहे.

येणाऱ्या काळात मतदार स्थलांतराचा व नवीन मतदार नोंदणीचा आकडा वाढेल. जिल्ह्यातील ६९ हजार ५९० मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. येणाऱ्या काळात हा आकडा वाढेल.

मतदार वळण्याची कारणे काय?स्थलांतर झालेल्या मतदारांसह दुबार नावे असणे, चुका असणे, दोन ठिकाणी मतदान असणे, या व इतर कारणांमुळे मतदारांची नावे वगळली आहेत.

३१ हजार ९८३ मतदारांची भर३१ हजार ९८३ मतदारांची ११ महिन्यांत भर पडली आहे. जिल्ह्यात मतदार नाेंदणीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ८ लाख ४४ हजार ९९२ मतदार तिशीच्या आतील आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारविधानसभा...........................पुरुष ............स्त्री...........तृतीयपंथी......... एकूण

सिल्लोड........................१,७३,१९९............१,५४,३९२....००००............३,२७,५७९कन्नड.........................१,६८,०२५............१,५०,८०७....०४................३,१८,८३६

फुलंब्री.........................१,७८,८५५............१,५९,६००.....०४..............३,३८,१५९छत्रपती संभाजीनगर मध्य....१,६७,८७८.........१,५७,२५२......०३............३,२५,१३३

छत्रपती संभाजीनगर पश्चिम...१,८६,७७५.......१,६५,२५४......५६..........३,५२,०८५छत्रपती संभाजीनगर पुर्व......१,६३,८१२.........१,५२,२५१......०९..........३,२०,५७२

पैठण..........................१,६०,१९९............१,४३,२७८........०५.........३,०३,४८२गंगापूर....................१,७५,००२................१,५६,४०४.........१२.......३,३१,४२०

वैजापूर ..................१,६०,०७६................१,४४,३०३.........०१.......३,०४,३८०एकूण...................१५,३८,०२१................१३,८३,५४३......९४.....२९,२१,६५८

१८ वर्षे पूर्ण झाली, नोंदणी केली का? ......२०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. १८ वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदार नोंदणी करणे शक्य होणार आहे.

नोंदणी कशी कराल?....व्हॉट्सॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी करता शक्य आहे. तसेच, तहसील कार्यालयातही जाऊन नोंदणी करता येते. बीएलओशी संपर्क करूनही नोंदणी करता येते.

निवडणूक विभागाचे आवाहन.....आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ डिसेंबरपर्यंत राबविला जाईल. ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे ग्रामसभा घेतल्या असून, २ व ३ डिसेंबरला शिबिरे आयोजित केली आहेत. शिबिरांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे.- जिल्हा निवडणूक विभाग, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVotingमतदानElectionनिवडणूक