शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे

By बापू सोळुंके | Updated: February 8, 2025 19:38 IST

मृद व जलसंधारण विभागात राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मराठवाड्यात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी गट ‘ब’ दर्जाच्या अभियंत्यांची सुमारे बाराशे पदे रिक्त आहेत. शासनाने नुकत्याच राबविलेल्या भरती प्रक्रियेतून जलसंधारण विभागाला ६७० जलसंधारण अधिकारी मिळणार आहे. या अभियंत्यांना पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

राज्याच्या सात झोनअंतर्गत ३५ जिल्ह्यांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचे काम चालते. भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी काम करणाऱ्या मृद व जलसंधारण विभागात अनेक वर्षांपासून जलसंधारण अधिकाऱ्यांची पदभरती झाली नव्हती. परिणामी, रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य सरकारने जलसंधारण विभागाला ६७० पदे भरण्यास परवानगी दिली होती. गतवर्षी टीसीएस या संस्थेच्यावतीने ही भरती प्रक्रिया राबविली. जलसंधारण अधिकारी पदासाठी १४ ते १६ जुलैदरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे ६० हजार उमेदवारांनी हजेरी लावली होती. कॅटेगिरीनिहाय गुणवत्ता यादीतील ६७० उमेदवारांची निवड करण्यात आली. या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी १८ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवड होऊनही अद्याप नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. कागदपत्रांची पडताळणी झालेले उमेदवार मागील तीन महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या उमेदवारांकडून नियुक्तीपत्रे कधी मिळणार याविषयी सतत विचारणा होत असते. आता या उमेदवारांना अधिक काळ प्रतीक्षेत न ठेवता त्यांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने घेतला आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना पुढील आठवड्यात मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्वाधिक रिक्त पदे मराठवाडा विभागातमृद व जलसंधारण विभागात राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मराठवाड्यात आहेत. शासनाने एकूण रिक्त पदांच्या केवळ ४० टक्के पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत आठ जिल्ह्यांतील एकूण १६७ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी मिळाली होती.

कोणत्या विभागात किती जणांना मिळणार नियुक्तीपत्रेछत्रपती संभाजीनगर= १६७नागपूर-९९अमरावती-- १०८कोकण--- ६१नाशिक ---११०पुणे-- ९१

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प