छत्रपती संभाजीनगर : महावितरणने ६.५० लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीमुळे शहरातील सुभेदारी विश्रामगृहाचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी खंडित केला. त्यामुळे येथील ४५ ‘सूट’ अंधारात बुडाले. सा. बां. विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सुभेदारीचे सुमारे ६.५० लाख रुपयांचे वीजबिल अनेक दिवसांपासून भरले गेलेले नाही.
महावितरणने वारंवार आवाहन करूनही बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की सा. बां. विभागावर आली. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. पूर्ण बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा जोडून न देण्याचा पवित्रा महावितरणने घेतल्याचे समजते. ४५ ‘सूट’चा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सुत्रांनी दिली.
‘व्हीआयपी’ सूटचा पुरवठा सुरळीतसुभेदारी विश्रामगृहात ४ वीज जोडण्या आहेत. यातील ३ वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, मुख्य इमारत आणि व्हीआयपी सूटचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे.