शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

६५ गावांत देणार रास्त भाव दुकान

By admin | Updated: July 17, 2017 23:31 IST

हिंगोली : वसमत उपविभागानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित गावांतील रास्त भाव दुकानांसह केरोसिन विक्रीच्या परवान्यासाठी पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वसमत उपविभागानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित गावांतील रास्त भाव दुकानांसह केरोसिन विक्रीच्या परवान्यासाठी पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला बचत गटांना यात प्राधान्य दिले जाणार असून यासाठी इतरही निकषपात्र लाभार्थी अर्ज करू शकणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांत रास्त भाव दुकानांसह केरोसिन विक्रीचे परवाने बंद झालेले किंवा दिलेच नसल्याची परिस्थिती आहे. आता या गावांत अशी दुकाने देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी दोन्हीपैकी एक तर काही ठिकाणी धान्य व केरोसिन असे दोन्ही विक्रेते नेमले जाणार आहेत.यात कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा, नांदापूर-१ व २, दाभाडी, डोंगरगाव नाका, वारंगा फाटा-२, टाकळी का., गौळ बाजार-२, गंगापूर, आराटी, गारोळ्याची वाडी, उमरा, कांडली-२, माळेगाव, तुप्पा, झरा, भाटेगाव, जांभरुण, जटाळवाडी, चिखली-१ व २, हिवरा-२, डोंगरगाव पूल-, वसफळ, बिबथर, टव्हा, नरवाडी, शेनोडी, धानोरा ज., जांब, काळ्याची वाडी, घोडा-१ या ३२ गावांचा समावेश आहे. तर हिंगोली तालुक्यात जयपूरवाडी, चिंचपुरी, वाढोणा, करंजाळा, खंडाळा, इडोळी, बेलुरा, कापूरखेडा, गारमाळ, कनका, हिंगणी, सावरखेडा, सांडस, गिलोरी, व हिंगोलीत दोन परवाने दिले जाणार आहेत. सेनगाव तालुक्यात बोडखा, तांदूळवाडी, चांगेफळ, खैरी, मोहरखेडा, गोरेगाव, मन्नासपिंप्री, रेपा, सोनसावंगी, भगवती, पिंपरी, खैरखेडा, खुडज, कडोळी, तपोवन, तळणी या १५ गावांचा समावेश आहे.यापूर्वीच प्रक्रिया सुरू झालेला मात्र अंतिम निवड जाहीर करण्याचे बाकी असलेली वसमत तालुक्यातील ४0 गावे आहेत. या गावांची पूर्ण प्रक्रिया झाली आहे. यात अर्ज सादर करणाऱ्या बचत गट व इतर लाभार्थ्यांना गुणांकन देण्यासाठी त्रयस्थ समिती नेमली होती. गुणांकन करताना त्यांनाही ठराविक बाबीच तपासायच्या होत्या. त्याला त्या तुलनेत गुण होते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ते पुन्हा महिलांच्या ग्रामसभेसमोर ठेवले जाणार आहेत. यात वसमत तालुक्यात हयातनगर, सोन्ना, आरळ, जुनुना, वसमत, कुरुंदवाडी, कुडाळा, सिंगी, करंजाळा, महमदपूरवाडी, पांग्रा संती, कोनाथा, पारवा/पळसगाव, खुदनापूर, बोराळा तर औंढा तालुक्यातील टाकळगव्हाण, टाकळगव्हाण त. औंढा, धारखेडा, अजरसोंडा, टेंभूरदरा, हिवरखेडा, औंढा-३, वडचुना, वडद-१, जवळा बाजार-४, काकडदाभा, असोला त.औंढा क्र.२, साळणा, सावंगी, सावळी तांडा, सेंदूरसना, येळी, माथा, देवाळा त. औंढा, कामठा, दरेगाव, पाझरतांडा, वाळकी, फुलदाभा, असोल्याचा समावेश आहे.