शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

६३३ अंगणवाड्या लवकरच इमारतीत

By admin | Updated: March 23, 2016 00:20 IST

रामेश्वर काकडे, नांदेड उघड्यावर अन् असुरक्षिततेच्या ठिकाणी ज्ञानार्जनासाठी भरणाऱ्या जिल्ह्यातील सहाशेवर अंगणवाड्यांना आता छत मिळणार आहे़

रामेश्वर काकडे, नांदेड उघड्यावर अन् असुरक्षिततेच्या ठिकाणी ज्ञानार्जनासाठी भरणाऱ्या जिल्ह्यातील सहाशेवर अंगणवाड्यांना आता छत मिळणार आहे़ त्यासाठी निधीही मिळाला असून त्यामुळे हजारो चिमुकल्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे़ जिल्ह्यात एकूण ३ हजार १० अंगणवाड्या असून त्यापैकी २३४५ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. तर ६६५ अंगणवाड्या इमारतीअभावी उघड्यावर भरतात. मात्र यावर्षी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून ६०० अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध होणार आहे़ तर ३३ अंगणवाड्या जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झाल्यामुळे एकुण ६३३ अंगणवाड्यांना इमारती मिळणार आहेत. त्यामुळे प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने अंगणवाडी इमारतीचा प्रश्न निकाली निघणार आहे़ इमारत बांधकामासाठी नुकतीच मंजुरी मिळाली असून मार्च २०१७ पर्यंत बांधकामावर निधी खर्च करावयाचा आहे. त्यासाठी माहूर आणि किनवट तालुक्यासाठी प्रती अंगणवाडी ६ लाख ६० हजार रुपये तर इतर तालुक्यासाठी प्रती अंगणवाडी ६ लाख रुपये याप्रमाणे निधी मिळणार आहे. ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करुन पंचायत समिती स्तरावर पाठवायचा असून पंचायत समिती स्तरावरुन सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर सदर ग्रामपंचायतींना अंगणवाडी बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतरच निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़ आजपर्यंत जिल्ह्यात विविध योजनेतंर्गत अंगणवाडी बांधकामांना मंजुरी देवून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय समविकास योजना २००७-८ मध्ये नऊ अंगणवाड्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता़ मानव विकास मिशन २००७-८ मध्ये २८, २००९-१० मध्ये ४४, २०११-१२ मध्ये ७४, २०१२-१३ मध्ये २६, २०१३-१४ मध्ये ७४ याप्रमाणे २४६ अंगणवाड्यांना इमारती मंजूर केल्या आहेत. तर जिल्हा वार्षिक योजनेतून २००८-९- २३, २००९-१०-६६, २०१०-११-२५६, २०११-१२-१२२, २०१२-१३ मध्ये ९६, २०१३-१४-२७ अशा ५९० तर ग्रामीण पायाभूत विकास योजनेतंर्गत २०१०-११-१७४, २०११-१२-२० अशा १९४ अंगणवाड्यांना इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेंतर्गत- २०१०-११ मध्ये ५७, २०११-१२-३२, २०१२-१३-२६ तर जिल्हा वार्षिक आदीवासी उपाययोजना स्टेट २०१३-१४-८६, आदिवासी उपाययोजना डीपीडीसीतून २७ अशा २२८ तर तेराव्या वित्त आयोगातून २०११-१२ मध्ये ३७ व २०१२-१३ मध्ये ३२ अशा ६९ याप्रमाणे विविध योजनेतून १३३६ अंगणवाड्यांना इमारत बांधकांमासाठी मंजुरी मिळाली आहे़ यापैकी ७४५ कामे पूर्ण झाली असून त्यावर २७ कोटी ८६ लाख ६४ हजार ३७६ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर ३२५ कामे प्रगतीपथावर असून २६६ कामे मंजुरी मिळूनही सुरुच झाली नाहीत. या वर्षात बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एकूणच आता जिल्ह्यातील जवळपास सर्वच उघड्यावर भरणाऱ्या अंगणवाड्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे़