शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

६२ हजार ग्रामस्थांनी केले श्रमदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 00:42 IST

कळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले.

बालाजी आडसूळ। लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले. पवार्तील ४५ दिवसांत उपरोक्त गावांतील ६२ हजार ७५० लोकांनी श्रमदान केले. श्रमदान व यंत्रसामुग्रीद्वारे तब्बल ३ लाख ७३ हजार ३१७ घनमिटर एवढे जलसंधारणाचे काम करण्यात आले आहे.कळंब तालुका हा अनियमित पर्जन्याचा भाग. तालुक्याच्या अर्थकारणावर शेतीचा जीतका प्रभाव तीतकाच शेतीवर लहरी निसगार्चा प्रभाव आहे.यातच जलसिंचनाची कोणतीही शाश्वत साधने उपलब्ध नसल्याने या बेभरवशाच्या पावसावरच सर्वस्वी अवलंबून रहावे लागत होते. यातूनच बिघडलेल्या अर्थकारणामुळे मध्यंतरी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला तालुका म्हणूनही कळंबकडे पाहिले जात होते. अशा कठीण स्थितीत सिंचनाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते.मोठ्या प्रकल्पासाठी ‘साइट’ नसल्याने भूउपचाराची लहान-मोठी कामे करून गावचा व गावशिवारातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा मुद्दा समोर आला. हाच धागा पकडून पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ पर्व दोनसाठी कळंब तालुक्याची निवड केली. यानंतर फाउंडेशनच्या वतीने याभागातील लोकजीवन, भौगोलिक स्थिती यांचा सखोल अभ्यास करून एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. फाउंडेशनचे विभागीय समन्वयक इरफान शेख, संतोष शिनगारे यांनी यासाठी क्षमता बांधणीचा, नेतृत्व विकासाचा व जलसाठवण तंत्राची शास्त्रोक्त ओळख करून देणारा वेगवेगळ्या टप्यावरील प्रशिक्षण कार्यक्रम तालुक्यात राबवला.यात जवळपास ७० गावातून चांगले जलदूत समोर आले. या टिमने गावा-गावात जलजागृती करून अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतल्याने कळंब तालुक्यात जलसंधारणाच्या नव्या चळवळीने उभारी घेतल्याचे चीत्र निर्माण झाले.