शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

तंत्रनिकेतनच्या ६० हजार जागा रिक्त राहणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:59 IST

राज्यात १ लाख २० हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्दे एक लाख २० हजार जागा; नोंदणी केवळ ५७ हजार

औरंगाबाद : राज्य तंत्रशिक्षण विभागामार्फत तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. नोंदणीची मुदत संपल्यानंतरही अवघ्या ५७ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्यात १ लाख २० हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे ६० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इयत्ता दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतन हा पदविका अभ्यासक्रम राज्यातील ४३२ महाविद्यालयांत शिकविण्यात येतो. यात शासकीय ४३ महाविद्यालयांचा समावेश आहे. यावर्षी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेश पूर्ण क्षमतेने करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्या नेतृत्वात २२ मे रोजी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. प्रवेशासाठीच्या बैठका आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे करिअर मार्गदर्शन करण्यासाठी दोन कोटींचा चुराडा करण्यात आला. ३ जुलै रोजी नोंदणी संपली तेव्हा ५७ हजार ५६६ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली होती. यानंतर चुका दुरुस्ती, आक्षेप नोंदणीसाठी मुदत देण्यात आली.

आता ११ जुलै रोजी संवर्गनिहाय यादी जाहीर होणार आहे. यानंतर १२ ते १४ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना पर्याय फॉर्म भरून द्यावे लागतील. त्यानंतर १६ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांना १७ ते १९ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करावे लागतील. ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांत २० हजार जागा उपलब्ध आहेत, तर ३८९ खाजगी महाविद्यालयांत १ लाख जागा आहेत. २० टक्के विद्यार्थी पसंतीचे महाविद्यालय, शाखा न मिळाल्याने प्रवेश घेत नाहीत. त्यामुळे रिक्त जागा ७३ हजारांवर पोहोचण्याची शक्यताही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

संचालक स्वत:ची खुर्ची वाचविण्यात व्यस्त?राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्या नेमणुकीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण निर्णय देत निवड रद्द केलेली आहे. या निर्णयाला शासनामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले असून, त्याची सुनावणी सुरू आहे. शासनाच्या बाजूने निकाल लागण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने मुंबईहून विधिज्ञांना औरंगाबादला पाठवले होते.यासाठी झालेला खर्च औरंगाबादच्या विभागीय तंत्रशिक्षण विभागाच्या माथी मारण्यात आल्याचे पत्रही ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. एकीकडे तंत्रशिक्षण विभागाचा गोंधळ थांबत नसल्याची स्थिती असताना दुसरीकडे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. यात संचालकांची खुर्ची धोक्यात असल्यामुळे त्यांना याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद