शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

दरोडाप्रकरणी तब्बल ४० वर्षांनंतर ६० वर्षीय वृद्धाची निर्दोष सुटका; गुन्ह्यातील गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:53 IST

याबाबत छावणी पोलिस ठाण्यात ३९५ आयपीसीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.  गुन्ह्यातील गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता.

डॉ. खुशालचंद बाहेती

लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ४० वर्षांपूर्वीच्या दरोडा प्रकरणात ६० वर्षीय आरोपीची छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

२१ नोव्हेंबर १९८४ रोजी पाच जणांनी औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप परिसरातून रिक्षा भाड्याने घेऊन रात्री १० वाजता माळीवाड्यातील पंडित आधाव यांच्या फार्म हाऊसवर दरोडा घातला होता. याबाबत छावणी पोलिस ठाण्यात ३९५ आयपीसीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.  गुन्ह्यातील गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता.

जामिनावर सुटल्यावर सर्व आरोपी झाले होते फरार

कोर्टातून जामिनावर सुटल्यावर सर्व आरोपी फरार झाले. २०१९ मध्ये यापैकी एकाला पकडून पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्याच्याविरुद्ध फेब्रुवारी २०२४ पासून खटला सुरू झाला व डिसेंबर २०२५ मध्ये न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी त्याची निर्दोष मुक्तता करत ४० वर्षांच्या न्यायिक क्लेश प्रक्रियेतून सुटका केली. सरकारी वकील बाळासाहेब मेहर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

४० वर्षे आरोपी शहरात बिनबोभाट रिक्षा चालवतो

गुन्ह्याचे दोन तपास अधिकारी- छावणी ठाण्याचे तेव्हाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक दीपकसिंग गौर १२ वर्षांपूर्वी एसीपी म्हणून, तर प्राथमिक तपास केलेले त्या वेळचे प्रोबेशनर पीएसआय ७ वर्षांपूर्वी निवृत्त झाले.

आश्चर्य म्हणजे, सर्व साक्षीदार व पोलिस अधिकाऱ्यांनी २० वर्षांचा असताना अटक झालेल्या आरोपीला तो ६० वर्षांचा झाला असतानाही कोर्टात बरोबर ओळखले.

४० वर्षे आरोपी शहरात रिक्षा चालवतो. त्याला लायसन्स, परमिट, बॅज मिळण्यासाठी त्यांच्यावरील गंभीर गुन्ह्याचा कोणताही अडथळा आला नाही, हे विशेष.

फरार आरोपी मिळाल्यास खटला पुन्हा सुरू होणार

न्यायालयाला खटल्याची कागदपत्रे तुकडे पडू नयेत म्हणून अत्यंत जपून हाताळावी लागली. ५ फरार आरोपी मिळतील, तेव्हा खटला पुन्हा सुरू होईल. देशभरात दशकानुदशके प्रलंबित असलेल्या शेकडो खटल्यापैकी हा एक आहे.

उरणमध्ये दोन खटले      ७२ वर्षांपासून प्रलंबित

महाराष्ट्रातील सर्वांत जुने खटले उरण (रायगड) न्यायालयात आहेत. दारूबंदी कायद्याचे २ खटले ७२ वर्षांपासून, तर नोकराने केलेल्या  चोरीचा १ खटला  ६८ वर्षांपासून प्रलंबित आहे. हे खटले कसे निकाली निघणार हा प्रश्नच आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man acquitted after 40 years in robbery case; weapon seized.

Web Summary : A 60-year-old man was acquitted in a 40-year-old robbery case in Chhatrapati Sambhajinagar. Arrested in 1984, he was released on bail and absconded. Re-arrested in 2019, he was finally acquitted in 2024. The original case involved a gang robbery with a country-made pistol seized.
टॅग्स :Courtन्यायालय