शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षकाराकडे मागितली ६० हजार रुपये लाच , वकिलाला एसीबीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:24 IST

खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्यासमोर चालू शेतीसंबंधी केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी पक्षकार महिलेकडे ६० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी एका वकिलाला अटक केली.

औरंगाबाद : खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्यासमोर चालू शेतीसंबंधी केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी पक्षकार महिलेकडे ६० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी एका वकिलाला अटक केली.शरद विठ्ठलराव भागडे (रा. लक्ष्मी कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या पतीचे निधन झालेले आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी तक्रारदार यांना ‘हिबानामा’च्या आधारे (स्वत:च्या मालकीची जमीन दुसऱ्याच्या नावे करून देणे) शेती दिली होती. या शेतीचा फेर त्यांच्या नावे घेण्यासाठी महिलेने महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या नावे फेर घेण्याबाबत आक्षेप असल्याने हे प्रकरण खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्यासमोर निर्णयासाठी गेले. याबाबत नायब तहसीलदार सुनावणी घेत होते.याप्रकरणात नायब तहसीलदार यांना सांगून तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून अ‍ॅड. शरद भागडे यांनी तक्रारदार महिलेकडे ६० हजार रुपये लाचेची मागणी केली. महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा पंचासमक्षही अ‍ॅड. शरद यांनी महिलेकडे लाचेची मागणी केली. मात्र, त्यांनी लाचेची रक्कम घेतली नाही. दरम्यान ९ एप्रिल रोजी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अ‍ॅड. शरदविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी अ‍ॅड. शरदला अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने अ‍ॅड. शरद यांना १२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावत हर्सूल कारागृहात रवानगी केली.यांनी केली कारवाईही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस कर्मचारी अश्वलिंग होनराव, भीमराज जिवडे, कल्याण सुरासे, संतोष जोशी यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग