शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:53 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी ...

ठळक मुद्देजायकवाडी मृतसाठ्यात : १६ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. १६ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. १०५० टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे.जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर १६ मध्यम प्रकल्पांत २.२० टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. ९३ लघु प्रकल्पांतही अत्यल्प पाणीसाठी शिल्लक आहे. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ६ हजार ४२८ जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. १५ छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ४१२ जनावरांची संख्या आहे. सिल्लोडमध्ये १७९, गंगापूर तालुक्यात १६६, वैजापूर तालुक्यात १५६ टँकरने, तर औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी शासनाने ५९ लाख ७९ हजार ९०५ रुपये इतके अनुदान दिले आहे. ७५ टक्के रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच छावणी संयोजकांना अनुदानाची मागणी करता येणार आहे.४७४ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील ४७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १२७ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ३४६ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. ३९४ विहिरी गावांतील आहेत. २५८ वाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील पावणेतीन लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. फुलंब्रीतील दीड लाख, पैठण सव्वादोन लाख, गंगापूर अडीच लाख, वैजापूर दोन लाख, खुलताबाद ८५ हजार , कन्नड २ लाख, सिल्लोड तीन लाख, सोयगाव तालुक्यातील १५ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई