शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

अब्दुल सत्तारांची ६ कोटी ८५ लाख; तर पत्नीची चार कोटींची मालमत्ता; विरोधात एकूण सहा गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:30 IST

उमेेदवार अब्दुल सत्तार यांच्याकडे ५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता असून, १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

सिल्लोड : सिल्लोड विधानसभा मतदारसंघाने महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी एक अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे. त्यात त्यांच्याकडे एकूण ६ कोटी ८५ लाख २७ हजार ६०१ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उमेेदवार अब्दुल सत्तार यांच्याकडे ५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता असून, १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या पत्नींच्या नावे ३ कोटी ९७ लाख २९ हजार ९३६ रुपयांची जंगम मालमत्ता असून, ४० लाख ६ हजार ७४० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सत्तार यांच्याकडे ३ लाख २० हजार रुपयांची शासकीय देणी असून, त्यांनी ३९ लाख ४९ हजार ३० रुपयांचे बँकेकडून कर्ज घेतले आहे. विविध बँकांमध्ये त्यांनी ६२ लाख २९ हजार ५७० रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्यांच्याकडे ५ लाख ९० हजार ४१६ रुपयांची रोख रक्कम आहे. तसेच १५ तोळे सोने असून, ७ लाख ९१ हजार ५८३ रुपयांचे हिरे त्यांच्याकडे आहेत. तसेच त्यांचे महिंद्रा इंटरप्राइजेस या कंपनीत १२ लाख ५० हजार रुपयांचे, तर विविध सहकारी संस्थांमध्ये २६ हजार ७०५ रुपयांचे, ए एस अजंता कन्स्ट्रक्शनमध्ये २ कोटी ५५ लाख ९२ हजार ८०१ रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांच्याकडे एक इनोव्हा कार आहे. त्यांचे २०२३-२४ चे एकूण उत्पन्न ९४ लाख ९५ हजार ४५६ रुपये आहे.

एकूण ६ गुन्हे दाखलसत्तार यांचे शिक्षण १९८४ मध्ये बीए एफवायपर्यंत शिक्षण झाले असून, त्यांच्याविरुद्ध एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ५ प्रकरणे न्यायालयीन स्तरावर प्रलंबित आहेत, तर पोलिस ठाणे स्तरावर एक प्रकरण प्रलंबित आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsillod-acसिल्लोडAbdul Sattarअब्दुल सत्तार