शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्यपूर्ण योजना! कामगार कुटुंबातील मुलींसाठी ५१ हजारांचे ‘कन्यादान’ योजना

By साहेबराव हिवराळे | Updated: March 5, 2024 19:34 IST

कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी हिताचा आणखी एक उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगार मजूर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाने विविध उपक्रम आणले असून, आता कन्यादान म्हणून मुलींच्या विवाहात ५१ हजार रुपये देण्यात येत आहेत.

कामगार उपायुक्त कार्यालयात दिलेल्या ऑनलाइनच्या साइटवर जाऊन कामगार पाल्याचा विवाह झाला असेल आणि रीतसर नोंदणी अपडेट केलेली असेल तर त्यास ५१ हजारांचा धनादेश कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात येतो. त्यातून विवाहाला मोलाचा हातभार लागणे म्हणजे डोक्यावरील मोठे ओझे कमी झाल्याचा सुखद अनुभव छत्रपती संभाजीनगरातील अनेक कामगारांना आलेला आहे. काही जण ऑनलाइन लागणारी विविध कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत.

ऑनलाइन अर्ज करूनही अनेकजण प्रतीक्षेत..हंगामी कामगारांना बांधकाम साहित्याची किट; तसेच संसारोपयोगी साहित्यही देण्यात आलेले आहे. शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली; परंतु मुलीच्या विवाहाची सर्वांत मोठी चिंता पालकांना भेडसावते. याबाबतही कामगारांनी ऑनलाइन अर्ज केलेले असून, ते प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या खात्यावर निधी त्वरित टाकावा, जेणेकरून कुटुंबाला हातभार लागेल.- प्रेम चव्हाण, कामगार नेता

ठेकेदारांकडून अपेक्षाअनेक हंगामी मजुरांना शक्यतो खेड्यात हाताला काम नसल्याने शहरात यावे लागते. मूलभूत हक्कांची त्यांना जाणीव नसते. खरे तर ठेकेदारांनीही अशा कामगारांची रीतसर नोंदणी करून त्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- विनोद कोरके, कामगार नेता

ऑनलाइन रीतसर अर्ज भरावा..कोणत्या तालुक्यात आणि शहरातील कोणत्या भागांत मुलीचा विवाह झाला, तिच्या विवाहाचा दाखला, पत्रिका आणि साक्षीदार अशा महत्त्वाच्या कागदपत्रांची नोंद घेतलेली असावी. कामगारांनी स्वत: ऑनलाइन अर्ज कार्यालयाकडे सादर करावा.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद