शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अब्दिमंडीतील २५० एकर जमिनीच्या  खरेदी-विक्रीत ५०० कोटींचा गैरव्यवहार?

By विकास राऊत | Updated: January 5, 2024 14:45 IST

या प्रकरणात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जमाबंदी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील अब्दिमंडी येथील गट क्र.११, १२, २६, ३७ व ४२ मधील २५० एकर जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये ५०० कोटींच्या गैरव्यवहाराच्या चर्चेने जिल्हा प्रशासन ढवळून निघाले आहे. या प्रकरणात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जमाबंदी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिवाळीपासून या प्रकरणाची चर्चा महसूल वर्तुळात सुरू आहे. महसूल मंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे सगळ्या यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. दसरा- दिवाळीच्या सुट्यांमध्येच त्या जमिनीच्या सुनावण्या, फेरफार आणि विक्रीचे व्यवहार करण्यात आले आहेत. महसूल शाखेच्या टेबलवर एका अव्वल कारकुनने ‘उत्तम’रीत्या संचिका हाताळली. यात काही तलाठ्यांची विशेष नियुक्ती केल्याची चर्चा आहे. महसूल शाखेतील अव्वल कारकून, विधी विभागातील अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या सुटीत याप्रकरणी परिश्रम घेतल्याचे बोलले जात आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, दुय्यम निबंधक यांच्यासह महसूल, मुद्रांक विभागातील यंत्रणा या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, चौकशीअंतीच सत्य-असत्य समोर येईल.

महसूल रेकॉर्डला ती जमीन निर्वासित मालमत्तागट क्र.११, १२, २६, ३७ व ४२ मधील २५० एकर जमीन ही एका व्यक्तीची मिळकत आहे. परंतु, महसूल रेकॉर्डला ई.पी.सरकार (ईव्हॅक्यू/ निर्वासित मालमत्ता) नमूद आहे का? जमीन मालकाच्या अपिलावर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्णय देत ई.पी.सरकारऐवजी जमीन मालकीची असल्याचे नोंद घेण्याचे आदेश दिले. मात्र, अप्पर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करता त्रयस्थ व्यक्तीच्या नावे महसूल अभिलेखात नोंदी केली आहे का? तसेच त्या जमिनीचा ८ नोव्हेंबर २०२३ रोजी फेरफार घेत त्रयस्थांच्या नावे विक्री पत्रही झाले. मूळ मालक बाजूला ठेवून हा सगळा प्रकार झाला असून, २५० एकर जमिनीत ५०० काेटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. यात दोषींवर शासन काय कारवाई करणार? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीतून उपस्थित केले होते.

महसूल मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेशजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार आदेश पारित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार त्या जमिनीच्या अभिलेखावर ई.पी सरकार अशी असलेली नोंद, त्याबाबतची याचिका, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अभिलेखात बदल झाले आहेत काय, याची खात्री करण्यासाठी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांनी सखोल तपासणी करून शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेश महसूल मंत्री विखे यांनी दिले आहेत.

खरेदी व्यवहाराला आव्हानचौकशी व सुनावणीदरम्यानच्या पुराव्यांआधारे तहसीलदारांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये ८ जणांची नावे जमिनीच्या फेरफारमध्ये घेतली. त्या आधारे ८ जणांनी अग्रवाल कुटुंबीयांना ही जमीन तातडीने विक्री केली. त्या खरेदी-विक्री व्यवहाराला दिवाणी न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. तसेच विभागीय आयुक्तांकडे देखील जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाला आव्हान दिलेले आहे. दरम्यान मुद्रांक विभागाने तातडीने खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याने सगळी साखळी यात गुंतल्याचे दिसते आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग