शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत ५० टक्के प्राध्यापकांची ‘बायोमेट्रिक’वर नोंदणीच नाही, मस्टरवरच हजेरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 22:42 IST

देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) रडारवर आले आहेत. १ डिसेंबरपासून मूल्यांकन प्रक्रियेत केवळ बायोमेट्रिकप्रणालीवरील उपस्थितीचाच विचार केला जाणार आहे.

औरंगाबाद : देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) रडारवर आले आहेत. १ डिसेंबरपासून मूल्यांकन प्रक्रियेत केवळ बायोमेट्रिकप्रणालीवरील उपस्थितीचाच विचार केला जाणार आहे; परंतु अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ५० टक्के प्राध्यापकांची बायोमेट्रिकवर नोंदणीच झालेली नसल्याचे समजते.

‘एमसीआय’ने डिजिटल मिशन मोड प्रकल्पांतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकांची आॅनलाइन उपस्थिती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीआय’च्या ३१ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे एक प्रकारे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यातून भारतीय वैद्यकीय शिक्षणाच्या मानांकनात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

घाटीमध्ये महाविद्यालय, रुग्णालय, मेडिसीन विभाग, शासकीय कर्करोग रुग्णालय या ठिकाणी एकूण २० बायोमेट्रिक उपकरणे लावण्यात आली आहेत. यातील १४ उपकरणे कार्यान्वित आहेत. बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी होण्यासाठी ‘एमसीआय’ने नेमलेल्या एजन्सीकडून प्राध्यापकांची नोंदणी होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेत २९ प्राध्यापक, ९९ सहयोगी प्राध्यापक आणि १४२ सहायक प्राध्यापक आहेत; परंतु आतापर्यंत केवळ ५० टक्के प्राध्यापकांचीच नोंदणी झाल्याचे समजते. चार महिन्यांपासून नोंदणीच ठप्प झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला गती मिळण्यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी नोडल अधिकारी म्हणून सहयोगी प्राध्यापक डॉ. मिर्झा शिराझ बेग यांची नियुक्ती केली आहे. संबंधित एजन्सीला दोनदा सूचना देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उर्वरित ५० टक्के प्राध्यापकांची नोंदणीच रखडली आहे. त्यामुळे त्यांची हजेरी मस्टरवरच लागत आहे. 

निर्णयाला खोडानिरीक्षणावेळी एका महाविद्यालयातील प्राध्यापक दुसºया महाविद्यालयात पाठवून ‘एमसीआय’ची मान्यता मिळविण्याचा प्रकार होतो. हा गैरप्रकार रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांसह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची रोजची उपस्थिती बायोमेट्रिकवर करण्याचा निर्णय झाला; परंतु त्यास खोडा बसत आहे. 

पाठपुरावा सुरू महाविद्यालय स्तरावर संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. संबंधित एजन्सीकडून नोंदणी होणे बाकी आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ५० टक्के प्राध्यापक, सहयोगी, सहायक प्राध्यापकांची नोंदणी राहिल्यासंदर्भात ‘एमसीआय’लाही कळविण्यात आले आहे. लवकरच ती पूर्ण होईल, अशी माहिती डॉ. मिर्झा शिराझ बेग यांनी दिली.