शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'महिलांना तिकिटात ५० टक्के सुट दिल्याने व्यवसाय बुडाला; काळीपिवळीचा सर्व टॅक्स माफ करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2023 16:37 IST

खाजगी वाहतुकदारांचे जोरदार निदर्शने; एसटीत महिलांच्या हाफ तिकीट योजनेस फुल प्रतिसाद मिळत असल्याने खाजगी प्रवाशी वाहतूक करणारे काळीपिवळी चालक मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

पैठण : खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना परिवहन करात शंभर टक्के सवलत द्यावी अशी मागणी करत बुधवारी मराठवाडा टँक्सी युनियनच्या वतीने पैठण तहसील कार्यालया समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. एसटीत महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिल्याने खाजगी प्रवाशी वाहतुकीवर गदा आली आहे. 

एसटीत महिलांच्या हाफ तिकीट योजनेस फुल प्रतिसाद मिळत असल्याने खाजगी प्रवाशी वाहतूक करणारे काळीपिवळी चालक मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पैठण ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान रोज ८० काळीपिवळी जीप प्रवाशी वाहतूक करतात. दररोज दोन ट्रीप होत असताना महिलांना एसटीत सवलत दिल्यानंतर आता तीन दिवसात एक ट्रिप होत असल्याने व्यवसाय संकटात सापडला असल्याचे मराठवाडा टँक्सी युनीयनचे कार्याध्यक्ष ईकबाल शेख यांनी सांगितले. काळीपिवळी चालविण्यासाठी वर्षभरात ६० हजार रूपये कर भरावा लागतो. राज्य सरकारने किमान हा कर माफ करून आम्हाला दिलासा द्यावा, सरकारने आमच्या मागण्याचा विचार केला नाही तर आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर येणार आहे, अशा प्रतिक्रिया युनीयनचे अध्यक्ष रहीम चॉंद शेख यांनी या वेळी व्यक्त केली. 

आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी भेट देऊन काळीपिवळी चालक मालकांच्या मागण्या बाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मराठवाडा टँक्सी युनियनच्या वतीने तहसीलदार शंकर लाड यांना निवेदन देण्यात आले.  अंदोलनात युनियनचे अध्यक्ष रहीम शेख, समिर पठाण, राजु गव्हाने, राजेंद्र डोंगरे, एकबाल शेख, हसन शेख,दादासाहेब जांभळे, मिनाज शेख, हबीब धांडे, प्रकाश लिबोरे, सलिम शेख,शोएब शेख, बजरंग पठाडे, सुनिल निळ, देविदास शेळके, जालिंदर चव्हाण , ईम्रान शेख, अमर टाक, तौफिक मुसा, कल्याण ताकवाले, अलिम पठाण, शौकत पठाण, रमेश लाहोटी, संजय शिंदे, बुढन कुरैशी, कलीम पठाण, प्रकाश शेळके, योगेश चव्हाण आदीसह मोठ्या संख्येने काळीपिवळी चालक व मालक सहभागी झाले होते.

एसटीच्या संपात आम्ही साथ दिलीएसटीने संप पुकारल्या नंतर राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत चार महिने  प्रवाशी वाहतूक करून आम्ही सरकारला साथ दिली. आता सरकार मुळेच आमच्यावर वाईट वेळ आली असून सरकारने आमचा विचार करावा अशी अपेक्षा मराठवाडा टँक्सी युनियनचे कार्याध्यक्ष ईकबाल ईस्माईल शेख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटी