शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; सकल मराठा समाजाने केला निश्चय

By बापू सोळुंके | Updated: March 2, 2024 18:54 IST

जळगाव रोडवरील मराठा मंदीर मंगलकार्यालयात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.

छत्रपती संभाजीनगर: शासनाने दिलेले एसईबीसी १० टक्के आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात एसआयटी लावून त्यांना अडकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्यावतीने सर्व राजकीय पक्षाविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा आणि सुमारे पाच हजार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. 

जळगाव रोडवरील मराठा मंदीर मंगलकार्यालयात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी दोन शिव्या घातल्या तर शासनाने त्यांच्यावर एसआयटी नियुक्त केली. मराठा समाजाला यापूर्वी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही, असे असताना पुन्हा तसेच ५० टक्केबाहेर आरक्षण माथी मारण्यात आले. हे आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी नाकारल्याने त्यांच्याविरोधात सरकारने षडयंत्र रचलण्यास सुरवात केल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे.  जरांगे पाटील यांच्यावर करीत असलेल्या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान चार उमेदवार याप्रमाणे एका तालुक्यातून प्रत्येकी एक हजार याप्रमाणे पाच तालुक्यातून एकूण पाच हजार उमेदवार मराठा समाज उभे करणार आहे. 

सर्वच राजकीय पक्षाचे आमदार खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे म्हणतात पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची त्यांची भूमिका चुकीची आहे. कारण राज्य मागास आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला असेल तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे आणि यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

राजकीय पक्षांच्या मोर्चा, सभा, बैठकांवर बहिष्कार कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभा असो किंवा मोर्चा, बैठकांवर मराठा समाजाने बहिष्कार घालवा, अथवा निषेधाचे फलक घेऊन उभे राहावे असा निर्णय आज घेण्यात आला.   यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि गावागावांत मराठा समाजाच्या बैठका घेण्याचेही यावेळी सर्वानुमते  ठरले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण