शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

किसान सन्मान योजनेतील ५२ बोगस लाभार्थ्यांकडून ५ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:47 IST

5 lakh paid by 52 bogus beneficiaries of Kisan Sanman Yojana नोटीस बजावलेल्या ८२ पैकी ५२ अपात्र लाभार्थ्यांची सुनावणी झाली

ठळक मुद्देगैरहजर बोगस लाभार्थ्यांना पुन्हा नोटीस५२ शेतकऱ्यांकडून ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली आहे.

सोयगाव: किसान सन्मान योजनेत अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या ४०१ शेतकऱ्यांना शासनाने नोटीस बजावली होती. सोमवारी सोयगाव मंडळातील १७ गावातील अशा बोगस लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली सुनावणी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. यामध्ये नोटीस बजावलेल्या ८२ पैकी ५२ अपात्र लाभार्थ्यांची सुनावणी घेवून फेरतपासणी करण्यात आली. सोयगाव मंडळातील नोटीसा बजावलेले सर्व ८२ शेतकरी अपात्र ठरले. या शेतकऱ्यांनी उचलेल्या ७ लक्ष ६९ हजार इतक्या लाभापैकी ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम ५२ लाभार्थ्यांनी भरणा केली आहे. पहिल्याच सुनावणीत ३० शेतकरी गैरहजर राहिले आहेत. शासनाच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.

किसान सन्मान योजनेत चुकीची माहिती भरून करदाते आणि पती-पत्नी या लाभार्थ्यांनी बोगस लाभ घेत असल्याचे शासनाच्या अंतिम सर्वेक्षणात उघड झाले होते. त्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यात ४०१ शेतकऱ्यांनी खोटा लाभ उच्झाल केल्याचे निष्पन्न झाल्यावरून सोमवारी सोयगाव मंडळातील १७ गावांच्या लाभार्थ्यांची सुनावणी घेण्यात आली या सुनावणीत ८२ पैकी ५२ शेतकरी हजर राहिल्याने या ५२ शेतकऱ्यांकडून ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या किसान सन्मान योजनेच्या सुनावणीसाठी करदाते यांनाच सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते.

गैरहजर बोगस लाभार्थ्यांना पुन्हा नोटीससोयगाव मंडळातील सुनावणीत गैरहजर राहिलेल्या ३० शेतकऱ्यांना पुन्हा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली. सोमवारी झालेल्या सुनावणीत कागदपत्रांच्या फेरतपासणीत चुकून एकही अपात्र ठरलेला लाभार्थी पात्र ठरला नव्हता त्यामुळे ५२ लाभार्थी अपात्रच असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

बोगस शेतकरी योजनेतून बादसोयगाव तहसील कार्यालयात झालेल्या किसान सन्मान योजनेच्या पहिल्याच सुनावणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्याने रक्कमेचा भरणा करताच त्याची भरणा केलेली पावती घेवून योजनेच्या संकेतस्थळावर पुन्हा अपलोड करून या बोगस लाभार्थ्यांना योजनेतूनच बाद करण्यात आले आहे.त्यामुळे किसान सन्मान योजनेचा पुढील हप्त्याची रक्कम यापुढे या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार नसल्याची रननीती या सुनावणीत आखण्यात आली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद