शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

छत्रपती संभाजीनगरात २०२३ मध्ये ४९० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक

By सुमित डोळे | Updated: December 29, 2023 13:32 IST

२०२२ च्या तुलनेत शंभर पटीने वाढल्या तक्रारी, २,६७५ नागरिक ऑनलाइन आमिषाला पडले बळी

छत्रपती संभाजीनगर : यंदाचे वर्षे शहरातील पतसंस्था, को-ऑपरेटिव्ह बँकांच्या घोटाळे, आर्थिक फसवणुकीच्या कोट्यवधींच्या आकड्यांनी गाजले. २०२२ च्या तुलनेत फसवणुकीत यंदा १०० पटीने वाढ हाेत ४९० कोटींची फसवणूक नोंदवली गेली. यात २,६७५ नागरिक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले.

विशेष म्हणजे, यात टेलिग्राम, क्रेडिट कार्ड, वर्क फ्रॉम होमचे फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक राहिले. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्याने शहरवासीयांना अचंबित केले. त्यानंतर शहरात घोटाळ्यांची मालिकाच सुरू होत जवळपास १२ घोटाळे उघडकीस आले. देवाई, आभा, आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि., ज्ञानोबा यांचा यात समावेश होता. यात हजारो सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले. मात्र, त्या व्यतिरिक्त जवळपास ६१ फसवणुकीचे प्रकार शहरात घडले.

प्रमुख मुख्य गुन्हेपोलिस ठाणे - घोटाळ्याची रक्कमछावणी - १,१४,३३,४२५सिटी चौक -१०,०७,००,०००सिडको -१०३,१६,७३,३८१सिडको - १,२२,६८,६८९सिडको -३५,९०,१९,९९१सिडको -२,८८, १७,५९३सिडको - ९९,०७,९०,५७९सातारा -२१,९४,७७,४९६मुकुंदवाडी -१,१४,३३,४२५एम. वाळूज - ४,८४,५८,९३९सिटी चौक - ९७,४१,००,०००क्रांती चौक -६८,००,०००

आर्थिक गुन्हे शाखेकडे नोव्हेंबर अखेर १०,२२७,५२०,४०२ कोटी रुपयांची फसवणुकीचे ५८ अर्ज प्राप्त झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.-२०२२ मध्ये ३ कोटी ५४ लाख ४८ हजार ७०५ रुपयांच्या फसवणुकीत ३१ गुन्हे.-२०२१ मध्ये १४ कोटी ५५ लाख ७१ हजार १२८ रुपयांच्या फसवणुकीत २२ गुन्हे.

इंटरनेटचे तोटे, ३,८६८ नागरिक अडकलेइंटरनेटच्या फायद्यांसह तोटेही जाणवत आहेत. यंदा ३,८६८ नागरिक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडून ७ कोटींपेक्षा अधिक रक्कम लंपास झाली.

वर्ष - फसवणुकीचे अर्ज२०२१ - १,३०८२०२२ - २,८५२२०२३ - ३,८६८

प्रकार             तक्रारी प्रलंबितऑनलाइन फ्रॉड - २,६७५ - १४३५सोशल मीडिया - १,१९३ - ५०१टेलिग्राम - १२ %वर्क फ्रॉम हाेम - ११ %क्रेडिट कार्ड - १५ %इन्शुरन्स/पॉलिसी - १४ %गुगलवर हेल्पलाइन क्र. शोधणे - ५ %सेक्साॅर्टशन - १८ %इंस्टंट लोन ऍप - १८ %इतर - ७ % 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादflashback 2023फ्लॅशबॅक 2023