शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

तीन वर्षांत ४८० आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:11 IST

शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि चांगले पीक हाती लागल्यानंतरही त्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होतो. यातूनच तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. अशा स्थितीत कर्ता पुरुष गेल्याने शेतकºयांच्या कुटुंबाची स्थिती अधिकच दयनीय होत असल्याचे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. नांदेड जिल्हाही याला अपवाद नाही.मागील १३ वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असले तरी मागील तीन वर्षांत अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. २००३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या २ घटना घडल्या होत्या. २००४ मध्ये ही संख्या २९ वर गेली. त्यानंतर २००५ मध्ये ११, २००६ मध्ये ६०, २००७ मध्ये ७२, २००८ मध्ये ५९, २००९ मध्ये ६०, २०१० मध्ये ५५, २०११ मध्ये ३३, २०१२ मध्ये ३९ तर २०१३ मध्ये शेतकरी आत्महत्येच्या जिल्ह्यात ४६ घटना घडल्या.अलीकडील तीन वर्षांत या घटनांत वाढ झाली आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल ११८ घटना पुढे आल्या आहेत. हीच परिस्थिती २०१५ मध्येही कायम राहिली. या वर्षात १९० शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले. तर २०१६ मध्ये १८० शेतकºयांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या घटनांचा अभ्यास केला असता अनेकांनी विषारी औषध प्राशन केले. काहींनी गळफास घेतला तर काहींनी विहिरीत उडी मारुन आपले आयुष्य संपविल्याचे दिसते.मागील वर्षभरापासून शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. २४ जून २०१७ रोजी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणाही केली.मात्र त्यानंतरही आत्महत्येच्या घटना थांबलेल्या नाहीत. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील १०४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याने शेतकरी आत्महत्येच्या या प्रश्नाकडे राज्य शासनाने अधिक संवेदनशीलपणाने पाहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील तेरा वर्षात जिल्ह्यात ९५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असल्या तरी त्यातील ६६६ शेतकºयांच्या कुटुंबियांनाच शासकीय मदत मिळाली आहे.