शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:40 IST

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात प्रारंभ होणार असून, २६ फेºयांतील मतमोजणीनंतर पूर्ण निकाल हाती येणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे ४६ हजार १५३ मतांची मोजणी होणार आहे.

ठळक मुद्दे२६ फेऱ्या : मतमोजणी कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम झाली, मात्र लपून-छपून

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात प्रारंभ होणार असून, २६ फेºयांतील मतमोजणीनंतर पूर्ण निकाल हाती येणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे ४६ हजार १५३ मतांची मोजणी होणार आहे. २३ एप्रिल रोजी १८ लाख ८६ हजार २९४ मतदारांपैकी ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रि येसाठी २०२१ नियंत्रण यंत्रसंच (कंट्रोल युनिट) मतदानासाठी वापरण्यात आले.मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट हाताळणे आणि मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने बुधवारी दुपारी ३ वाजता कर्मचाºयांची रंगीत तालीम घेतली. या कार्यक्रमाची माहिती प्रशासनाने बाहेर येऊ दिली नाही. मतमोजणी आणि केंद्र याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. एवढी गोपनीयता कशामुळे ठेवली, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. केंद्र परिसरात काय व्यवस्था आहे, पार्किंग कशी असणार, सामान्य नागरिकांना माहिती कशी मिळणार, माध्यम सुविधा काय आहेत. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्यासाठी मतदान केंद्रांची निवड सोडतीने करणार की इतर प्रकारे, हेदेखील प्रशासनाने समोर आणले नाही.मतमोजणी केंद्रातील तीन सभागृहांमध्ये प्रत्येकी दोन विधानसभा क्षेत्रांची मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या देखरेखीत ती मतमोजणी होणार आहे. निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाºयांसाठी वेगळे कक्ष असणार आहेत.मतमोजणी केंद्रातील व्यवस्था अशी-केंद्र जालना रोडच्या सर्व्हिस रोडलगत आहे. दक्षिणमुखी केंद्राच्या डाव्या बाजूला मतमोजणीसाठी येणाºया अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि केंद्र सुविधांसाठी काम करणाºयांसाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. सामान्य नागरिकांसाठी विमानतळासमोरून पाठीमागे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे पार्किंग व फेरीनिहाय निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.१८ व्या फेरीपर्यंत होणार चित्र स्पष्ट१८ व्या फेरीपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. ६० टक्के मतमोजणी या फेरीपर्यंत होईल. ११ लाख ९५ हजार २४२ पैकी ८ लाख ३० हजार ७५४ मतदान या फेरीपर्यंत मोजले जाईल, असा अंदाज आहे. या फेरीपर्यंत विजय कोणाच्या बाजूने आहे, याचा बºयापैकी अंदाज आलेला असेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९