शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

निवडणुकीच्या रणधुमाळीत हरवले मराठवाड्याचे ४५ हजार कोटींचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही 

By विकास राऊत | Updated: May 23, 2024 13:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. लाेकसभा निकालानंतर विधानसभेची तयारी सुरू होईल. त्यामुळे सरकार मराठवाड्याला हे पॅकेज कधी पावणार? असा प्रश्न आहे.

विकास राऊत -

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य  शासनाने मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या घोषणेला नऊ महिने झाले. यावर अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद झालेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. लाेकसभा निकालानंतर विधानसभेची तयारी सुरू होईल. त्यामुळे सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे. 

१४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद  अवकाळी पावसाने मराठवाड्याला तडाखा दिला. सध्या मराठवाड्यात पाणीटंचाई आहे. जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्यासाठी १ महिना उशीर केला. या पार्श्वभूमीवर पश्चिमी वाहिन्यांतील पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी स्वतंत्र १४ हजार ४० कोटींची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, याबाबत ठोस काहीही हालचाल झालेली नाही.

जिल्हानिहाय किती तरतूद? छ. संभाजीनगर    २,००० कोटीधाराशिव    १,७१९ कोटीबीड    १,१३३ कोटीलातूर    २९१ कोटीहिंगोली    ४२१ कोटीपरभणी    ७०३ कोटीजालना    १५९ कोटीनांदेड    ६६० कोटी एकूण : ७ हजार ८६ कोटी

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात तरतूद होऊन कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. - मधुकरराजे अर्दड, विभागीय आयुक्त

कोणत्या विभागासाठी  काय केल्या घोषणा?- जलसंपदा - २१ हजार ५८० कोटी २४ लाख- सार्वजनिक बांधकाम - १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख- पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मस्त्यव्यवसाय - ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख- नियोजन - १ हजार ६०८ कोटी २८ लाख - परिवहन - १ हजार १२८ कोटी ६९ लाख - ग्रामविकास - १ हजार २९१ कोटी ४४ लाख - कृषी विभाग - ७०९ कोटी ४९ लाख- क्रीडा विभाग - ६९६ कोटी ३८ लाख - गृह - ६८४ कोटी ४५ लाख - वैद्यकीय शिक्षण - ४९८ कोटी ६ लाख - महिला व बालविकास - ३८६ कोटी ८८ लाख - शालेय शिक्षण - ४९० कोटी ७८ लाख - सार्वजनिक आरोग्य - ३५.३७ कोटी - सामान्य प्रशासन - २८७ कोटी- नगर विकास - २८१ कोटी ७१ लाख - सांस्कृतिक - २५३ कोटी ७० लाख- पर्यटन - ९५ कोटी २५ लाख - मदत पुनर्वसन - ८८ कोटी ७२ लाख- वन विभाग - ६५ कोटी ४२ लाख - महसूल विभाग - ६३ कोटी ६८ लाख - उद्योग विभाग - ३८ कोटी- वस्त्रोद्योग - २५ कोटी- कौशल्य विकास - १० कोटी - विधी व न्याय - ३ कोटी ८५ लाख 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरणGovernmentसरकार