हिंगोली : दिनदयाल योजनेत महावितरणकडून यावर्षी ४५ कोटींची कामे केली जाणार आहेत. यात डीपी, वीजवाहिन्या, किटकॅट आदीचा समावेश आहे. तर मागील चार दिवसांपासून दुरुस्ती सुरू असली तरीही अद्याप महावितरण वादळात पडलेले पूर्ण खांब उभे करू शकली नाही. पुढील चार दिवस यात जाणार आहेत. यासाठी ७0 ते ७५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.हिंगोली जिल्ह्यात बळकटीकरणाच्या कामांसाठी २८.८५ कोटी मंजूर झाले आहेत. यात ५ एमव्हीएच्या सेनगाव-२, हिंगोली-२ अशा ४ रोहित्रांसाठी ४.१६ कोटी, ३.१५ एमव्हीच्या रोहित्राची ५ एमव्हीए अशी क्षमतावाढ करण्यासाठी वसमतला ५५.५८ लाख, फिडर सपरेशनसाठी जिल्ह्यात २४ कामांना ९९.५९ लाख, प्रत्येक तालुक्यात ५0 ते ६५ याप्रमाणे १00 केव्हीएच्या २८५ किटकॅटसह डीपीसाठी ७.८१ कोटी, नवीन १0 फिडर लावण्यासाठी १.८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उच्चदाब वाहिनीच्या १८१ किमी कामासह पोलसाठी ७.५१ कोटींचा निधी, लघुदाब वाहिनीच्या ७८ किमी कामास १.९६ कोटी, ट्रान्सफार्मरची क्षमतावाढ करण्याच्या ८0 कामांसाठी १.७२ कोटी, उच्चदाब वाहिन्यांना संरक्षण उपाय १.५१ लाख, लघुवाहिनीसाठी ५.७६ लाख, २२ एचटी कॅपॅसिटरसाठी -२.१५ कोटी रुपयांची तरतूद आहे. याशिवाय आधुनिकीकरणाच्या कामांसाठी १६.९१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात ११ केव्ही व्हीसीबीच्या ५२ कामांसाठी १.१६ कोटी, डीटीसी अर्थिंगच्या १८00 कामांसाठी १.१६ कोटी, उच्च दाब खांबांच्या रीअर्थिंगच्या १६00 कामांसाठी १८.८९ लाख, लघुवाहिनीच्या १८00 गांबांसाठी १६.८१ लाख, उच्चदाब वाहिनीच्या गार्डिंग बदलासाठी ८५0 कामांसाठी १.२८ लाख, लघुदाबच्या ८५0 कामांसाठी ५४.१९ लाख, ६३ केव्हीएच्या किटकॅट बदलाच्या १२५0 कामांसाठी ३.४८ कोटी, १00 केव्हीएचे बॉक्स बदलण्याच्या १२00 कामांसाठी ३.४७ कोटी, लघुदाब केबल बदलाच्या कामांसाठी ४.४0 कोटी, अतिरिक्त खाबांच्या १७0 कामांसाठी ४१.८९ लाख व इतरही कामे आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
४५ कोटींची कामे होणार
By admin | Updated: June 12, 2016 22:52 IST