शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

उद्योजक विवेक देशपांडेविरूद्ध ४२० दाखल, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली जमीन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 1:22 PM

आरोपींमध्ये चारजणांचा समावेश

औरंगाबाद : रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक कंत्राटदार विवेक शंकरराव देशपांडे (रा. आदित्यनगर, गारखेडा) यांच्यासह चारजणांविरूद्ध बनावट लेटरहेड, शिक्के तयार करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

विवेक देशपांडे यांच्यासह गजानन रामजी बोदडे (रा. अविष्कार कॉलनी, एन ६, सिडको), गणेश गुलाबराव धुरंधर (रा. मसनतपूर, अशोकनगर, चिकलठाणा) आणि जयसिंग लक्ष्मण चव्हाण (रा. गारखेडा) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सविता निरंजन वानखेडे (रा. एन २, कामगार चौक, संत तुकोबानगर, सिडको) यांनी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. या तक्रारीनुसार प्रशिक वीट व चुना उत्पादक सहकारी संस्थेच्या करमाड शिवारातील एक एकर जमिनीचा या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. प्रशिक वीट व चुना उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी १९९३ साली झाली आहे. या संस्थेचे ११ सभासद असून, मृत ईश्वरदास विक्रम अभ्यंकर हे अध्यक्ष आहेत. सविता वानखेडे या सचिव आहेत. या संस्थेने १९९४ साली रामनाथ उर्किडे यांच्याकडून करमाड शिवारातील गट नंबर १८३मध्ये एक एकर जमीन ६० हजार रुपयांत खरेदी केली होती. तेव्हापासून ही जागा संस्थेच्या ताब्यात आहे. 

संस्थेचे सभासद गणेश धुरंधर यांनी ४ ऑक्टोबर २०२० रोजी फिर्यादीचे पती रामदास अभ्यंकर यांना माहिती दिली की, संस्थेची जमीन गजानन बोदडे आणि विवेक देशपांडे यांनी संगनमताने हडपली आहे. तेव्हा फिर्यादी नागपुरात वास्तव्यास होते. ते औरंगाबादेत परतल्यानंतर संस्थेची जमीन धुरंधर, बोदडे यांनी संस्थेचे बनावट लेटरहेड, शिक्के तयार करुन विवेक देशपांडे यांना ३० सप्टेंबर २०२० रोजी विक्री केल्याचे कागदपत्रावरुन स्पष्ट झाले. फिर्यादींनी संस्थेच्या सदस्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीला सभासद बोदडे आणि धुरंधर अनुपस्थित राहिले. बनावट लेटरहेडवर सूचक व अनुमोदक म्हणून नाव असलेले सभासद शैलेश गजभिये व रामराव धाकडे यांनी बैठकीत सांगितले की, त्यांना व्यवहाराची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्या कागदपत्रावर त्यांची नावे टाकून बनावट स्वाक्षरी करून ठराव मंजूर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे बनावट कागदपत्र करताना बोदडे अध्यक्ष तर धुरंधर सचिव बनले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

८५ लाखांची जमीन १२ लाखांत खरेदीबनावट लेटरहेड व शिक्क्यांचा वापर करून खरेदी केलेल्या जमिनीची शासकीय किंमत ८५ लाख २२ हजार रुपये आहे. मात्र, केवळ १२ लाख रुपयांचा रोख व्यवहार दाखवून दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १, औरंगाबाद कार्यालयात दस्त क्रमांक ३८९४ अन्वये बोगस खरेदी खत करून शासनाची व संस्थेची फसवणूक केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

कोट्यवधीचा बाजारभावही जमीन करमाड शिवारात जालना रोडवर आहे. या एक एकर जमिनीची शासकीय किंमत ८५ लाख रुपये असली, तरी बाजारभावानुसार या जमिनीची किंमत ही तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा संस्थेच्या एका सभासदाने केला. याशिवाय डीएमआयसी प्रकल्पाच्या परिसरातच ही जमीन येत असल्याचेही संबंधितांना सांगितले. त्यामुळे आगामी काळात जमिनीचे मूल्य अधिक वाढणार असल्याचेही स्पष्ट होते.

चुकीचा एफआयआर दाखलजमिनीचा व्यवहार माझ्या नावावरच झालेला आहे. आमच्या सातबारामध्ये असलेली ती जमीन आहे. त्या सातबारात त्यांचे नाव लागले. टायटल क्लिअर व्हावे, यासाठी खरेदी केली. त्यासाठी रितसर स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. पोलिसांनी शहानिशा न करताच एफआयआर दाखल केला आहे. चुना-वीटभट्टीशी माझा काही संबंध नाही. त्यांनी जमीन विकली. मी खोट्या सह्या केल्या, असे कसे होईल. विकणाऱ्यांनी केल्या असतील. माझ्या सह्या खऱ्या आहेत.- विवेक देशपांडे, रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमुख

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद