शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ४२ ठिकाणे बनली सायलेन्स झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:30 IST

शहरातील रुग्णालये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय परिसरासह अन्य न्यायालये आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर शांतता परिसर म्हणून राज्य शासनाने घोषित केला आहे.

गॅझेटमध्ये नोंद : ३० रुग्णालये, ९ शैक्षणिक संस्थांसह न्यायालय परिसरात वाद्य मिरवणूक, लाऊडस्पीकरवर बंदीऔरंगाबाद : शहरातील रुग्णालये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय परिसरासह अन्य न्यायालये आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर शांतता परिसर म्हणून राज्य शासनाने घोषित केला आहे. राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या राजपत्रात (गॅझेट) सायलेन्स झोन अर्थात शांतता परिसर म्हणून घोषित केलेल्या ४२ ठिकाणांची यादीच प्रसिद्ध केली.काही वाहनचालकांना विनाकारण हॉर्न वाजविण्याची सवय असते. यातील अनेक वाहनांना कर्कश हॉर्न बसविलेले असतात. ध्वनी प्रदूषणाचा त्रास रुग्णांना होतो. एवढेच नव्हे तर ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही गोंगाटामुळे अडथळा निर्माण होतो. न्यायालयीन कामकाजातही व्यत्यय येतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील ४२ ठिकाणांना शांतता परिसर म्हणून घोषित करावीत, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मान्य करून राज्य शासनाने गत महिन्यात शांतता परिसर म्हणून घोषित केलेल्या ४२ ठिकाणांच्या नावाची यादी राजपत्रात प्रकाशित केली. यात ३० रुग्णालये, ९ शैक्षणिक संस्थांमध्ये डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधि कॉलेज, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, सेंट फ्रान्सिस शाळा परिसर, सुशीला देवी हायस्कूल, नाईक कॉलेज परिसर, मिलिंद कॉलेज, लिटल फ्लॉवर शाळा छावणी आणि जसवंतपुरा येथील मनपा शाळा परिसरा आदी संस्थांचा यात समावेश आहे. उच्च न्यायालय परिसर, अदालत रोड आणि कोकणवाडी येथील ग्राहक मंच न्यायालय परिसराचा यात समावेश आहे, तर घाटी रुग्णालय परिसर, आमखास मैदान येथील शासकीय कर्करोग रुग्णालय, महापालिकेचा जकातनाका येथील दवाखाना परिसर, रोशनगेट येथील मनपा दवाखान्यासह, धूत हॉस्पिटल परिसर, राज्य कामगार विमा रुग्णालय चिकलठाणा आदींसह अन्य खाजगी रुग्णालयांचा यात समावेश आहे. या परिसरात नागरिकांना वाद्य मिरवणूक काढणे, लाऊडस्पीकर वाजविणे, वाहनांचा हॉर्न वाजविण्यास मनाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलCourtन्यायालयSchoolशाळा