शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कचरा प्रक्रियेसाठी ४१७ खुल्या जागांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 19:26 IST

शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या ६८ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. या काळात विभागीय आयुक्तालय, पालिकेत रोज बैठकांचे सत्र सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या ६८ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. या काळात विभागीय आयुक्तालय, पालिकेत रोज बैठकांचे सत्र सुरू आहे. रोज नवीन-नवीन मुद्दे समोर येत असून, ११५ वॉर्डांमधील ४१७ खुल्या जागांचा पर्याय बुधवारी समोर आला. वॉर्डातील कचरा तेथे आरक्षित जागेतच कम्पोस्ट करण्यावर भर देण्याबाबत आयुक्तालयातील बैठकीत चर्चा झाली. 

मालमत्ता विभागाकडून आरक्षित जागांची माहिती विभागीय आयुक्तालयातील बैठकीत घेण्यात आली. वॉर्डातील कचरा प्रत्येक वॉर्डातच कम्पोस्ट केला जावा, उर्वरित प्लास्टिक व इतर सुका कचरा संकलन स्वतंत्ररीत्या केले जावे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीस उपसंचालक रिता मैत्रेवार, एमपीसीबीचे जे.बी. संगेवार, शहर अभियंता एस.डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सिकंदर अली, कचरा व्यवस्थापन नियंत्रण अधिकारी, प्रभागाचे वॉर्ड अधिकारी उपस्थित होते.

आधी समजावून सांगा, नंतर दंड लावा कचरा  फेकून न देता, वर्गीकरण करून  स्वच्छता कर्मचाऱ्याकडे तो द्यावा.  शहरात दररोज निर्माण होणाऱ्या १०० टक्के कचऱ्याच्या निर्मितीचे विलगीकरण करावे. जमा झालेल्या विलगीकृत कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी. प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कचरा विलगीकरणासाठी माहिती,  जनजागृती करावी. विलगीकृत कचरा न देणाऱ्या कुटुंबांना समजावून सांगावे. नियमांचे पालन केले नाही, तर दंडात्मक कार्यवाही करावी. कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या हॉटेल्स, मंगल कार्यालयांसह इतर आस्थापना, अपार्टमेंटस्, घरे यांच्यावरही मनपाचे पथक, वॉर्ड अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून दंड आकारावा. रस्त्यावरील डेब्रिजदेखील उचलून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी, असे निर्देश  दिले.

उद्योजकांना घालणार साकडे शहर सौंदर्र्यीकरणासाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्यासाठी त्यांना साकडे घालण्यात येणार आहे. यासंदर्भात उद्योजकांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्र दिनापासून स्वच्छ शहराकडे वाटचाल होण्यासाठी ३० एप्रिल रोजी महास्वचछता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक व्यक्तीने सामाजिक जबाबदारी स्वीकारून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. भापकर यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcommissionerआयुक्त