शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी मागितले ४ हजार ७२२ कोटी; सहा महिने झाले, अजून हाती भोपळाच !

By विकास राऊत | Updated: June 13, 2024 19:22 IST

सहा महिने झाले बैठकीला : नियोजन विभागाकडून अद्याप काही निर्णय नाही

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागण्याच्या शक्यतेमुळे १० जानेवारी रोजी मराठवाडा विभागाच्या २०२४-२५ च्या नियोजनासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी ऑनलाइन बैठक घेतली होती. आठ जिल्ह्यांनी ४ हजार ७२२ कोटींच्या नवीन मागण्या आराखड्याच्या अनुषंगाने केल्या; परंतु या मागण्या कागदावरच असल्यामुळे विभागाला अद्याप कुठलीही तरतूद झालेली नाही. शासनाने २६५३ कोटींची आर्थिक मर्यादा घालून दिली होती; परंतु जिल्ह्यांची अतिरिक्त मागणी २ हजार ६९ कोटी ९८ लाखांवर गेली. यापैकी किती तरतूद करण्याचा निर्णय झाला, हे सहा महिन्यांपासून गौडबंगाल आहे.

अर्थमंत्री पवार यांच्या दालनात मराठवाड्यातील ८ आणि उत्तर महाराष्ट्रातील ५ अशा १३ जिल्ह्यांची वार्षिक आढावा बैठक ऑनलाइन झाली होती. निवडणूक आचारसंहितेपर्यंत शासनाकडे अडीच महिने होते; परंतु शासनाने तरतूद करण्याचा निर्णय घेतला नाही. गेल्या वर्षी केलेल्या २ हजार ९४५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात सर्वांनी मागण्या केल्यानंतर १० टक्के सरासरी वाढ केली होती. मागणी केलेल्या तुलनेत अर्थखाते विभागाच्या पदरात काय टाकणार याकडे लक्ष आहे. आचारसंहितेमुळे डीपीसीतून काहीही कामे करता आली नाहीत. गेल्या वर्षीच्या नियोजनातील मंजूर कामेच पूर्ण झाली. एप्रिल, मे आणि जुन महिन्याचा पूर्वार्ध संपत आहे. अजून शासनाने काहीही घोषणा केलेली नाही. तरतुदीची घोषणा नंतर करण्यात येईल, असे अर्थमंत्री पवार यांनी जानेवारी महिन्यात स्पष्ट केले होते.

सध्या मराठवाड्यात ग्रामीण रस्त्यांच्या अडचणी, पाणीटंचाई आहे. शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतो आहे. काही जिल्हे मानव विकास निर्देशांकात मागे आहेत. डीपीसीची बैठक तीन महिन्यांत झालेली नाही. त्यामुळे अनेक कामांना मुहूर्त लागलेला नाही.

विधानसभा निवडणुका तोंडावरयंदाचे वर्ष निवडणुकीत जात आहे, त्यामुळे सर्वांना खुश करणाऱ्या योजनांचा अंतर्भाव विभागीय वित्त व नियोजनात असावा, यासाठी नियोजन विभागाकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी मागण्या केल्या होत्या; परंतु मराठवाड्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. डीपीसीसाठी तरतूद करताना अर्थखाते कसा निर्णय घेणार, यावर बऱ्याच बाबी अवलंबून आहेत.

जिल्हानिहाय मागणीजिल्हा............मागणीछत्रपती संभाजीनगर - १ हजार कोटीजालना - ४२३ कोटीपरभणी - ६८४ कोटीहिंगोली - ३३८ कोटीबीड- ५४० कोटीधाराशिव- ५८७ कोटीलातूर- ५२३ कोटीनांदेड- ६२३ कोटीएकूण.. ४७२२ कोटी 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागMarathwadaमराठवाडाAjit Pawarअजित पवार