शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

४ कोटी ३३ लाखांचे एलईडी साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:06 IST

शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे काम मनपाने दिल्ली येथील कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नवीन एलईडी दिवे बसविले. रविवारी कंपनीच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील गोडाऊनला आग लागली. या आगीत तब्बल ४ कोटी ३३ लाख रुपयांचे नवीन साहित्य जळून खाक झाले.

ठळक मुद्देघातपाताची शक्यता : सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे काम मनपाने दिल्ली येथील कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नवीन एलईडी दिवे बसविले. रविवारी कंपनीच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील गोडाऊनला आग लागली. या आगीत तब्बल ४ कोटी ३३ लाख रुपयांचे नवीन साहित्य जळून खाक झाले. गोदामाला आग लागली नसून, लावण्यात आल्याचेही प्राथमिक चौकशीत निष्पन्न होत आहे. कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले.इलेक्ट्रॉन एनर्जी प्रा.लि. या कंपनीने शहरात ४० हजार पथदिव्यांचे काम घेतले आहे. या कामासाठी कंपनीने सर्वोेच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाला एका रात्रीतून कंपनीला वर्कआॅर्डर द्यावी लागली होती. १२० कोटींचा हा प्रकल्प असून, यामध्ये कंपनीला शहरातील संपूर्ण पथदिव्यांची केबल बदलणे, जंक्शन बॉक्स उभारणी, नवीन १,२०० पोल उभे करणे, विजेची बचत, १० वर्षे संपूर्ण प्रकल्पाची देखभाल करणे आदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून कंपनी जोमाने काम करीत आहे. आतापर्यंत २७ हजार नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले. अनेक ठिकाणी केबल टाकण्यात आली. जंक्शन बॉक्स उभारणीचे काम सुरू आहे. या सर्व कामांसाठी कंपनीने एमआयडीसी चिकलठाणा येथे गोडाऊन उभारले आहे. गोडाऊनमध्ये फिटिंग बॉक्स, केबल, जंक्शन बॉक्स, प्लास्टिकपाईप आदी साहित्य ठेवले होते. रविवारी दुपारी अचानक गोडाऊनला आग लागली. या आगीत गोडाऊनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. आज आग विझल्यानंतर कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत बारकाईने तपासणी केली असता ४ कोटी ३३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.संशय बळावलागोडाऊनच्या दर्शनी भागात सुरक्षारक्षक कक्षामागे अगोदर आग लावण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ही आग कोणी आणि कशी लावली हे लक्षात येत नाही. कंपनीने संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले. फुटेजमध्ये काही व्यक्ती संशयित दिसून येत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग