शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

३७ हजार कुटुंब शौचालयाविना!!

By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST

कंधार : तालुक्यात २०१२ मध्ये शौचालय उपलब्धतेविषयीचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते़ ४३ हजार ८४१ कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला़

कंधार : तालुक्यात २०१२ मध्ये शौचालय उपलब्धतेविषयीचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते़ ४३ हजार ८४१ कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला़ त्यात ३६ हजार ९०५ कुटुंबापैकी शौचालय सुविधा उपलब्ध नव्हती़ फक्त ७ हजार ३४१ कुटुंबाकडे सुविधा असल्याचे संगणक आज्ञावलीतील नोंदणीनुसार (आॅनलाईन) समोर आले आहे़आॅनलाईन नोंदी करताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे़ इंटरनेट सुविधेचा पुरता बोजवारा गत १५ दिवसांपासून उडाल्याचे चित्र आहे़ इंटरनेट सुविधांचा लपंडाव, मंदगतीमुळे आॅपरेटरची मोठी दमछाक होत आहे़ काही कुटुंबानी सर्व्हेक्षण करताना मतदान ओळखपत्र क्रमांक न दिल्याने नोंदी करण्यास अडसर ठरत आहे़ त्यामुळे निर्मल भारत अभियान स्टेटस्ची नोंद करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे़ ११६ पैकी बाचोटी, बामणी (पक़ं़), बारूळ, भंडारकुमठ्याचीवाडी, भेंडेवाडी, भोजुचीवाडी, बोळका, चिखलभोसी, गांधीनगर, घागरदरा, गुलाबवाडी, गुंडा, इमामवाडी, जंगमवाडी, खुड्याचीवाडी, महालिंगी, मरशिवणी, मुंडेवाडी, नवरंगपुरा, पाताळगंगा, रामानाईकतांडा, तळ्याचीवाडी, वाखरड, पांगरा, वंजारवाडी या २५ ग्रामपंचायतींच्या संपूर्ण नोंदी आॅनलाईन करण्यात यश आले आहे़आलेगाव ४४, आंबुलगा ४३५, औराळ ६, बाळंतवाडी १०, बहाद्दरपुरा १७७, भूकमारी १८७, बिजेवाडी २३८, बोरी बु़ २६३, चिखली १००, चिंचोली (पक़़) १२६, चौकी महाकाया १४५, दहीकळंबा २७५, दैठणा १४२,दाताळा १२०, हाळदा ४३६, हाडोळी ब्ऱ ४३५, गुंटूर २९२, गोणार ४६९, गऊळ ८८, गंगनबीड ८०, दिग्रस बु़ २४६, धानोरा कौठा २५२, हटक्याळ ११२, कल्हाळी ९३८, कंधारेवाडी २३१, काटकळंबा ६५९, कौठा ७८१, कुरुळा ११८५, लाडका १८३, लालवाडी १११, मजरे धर्मापुरी १०४, मानसपुरी २०४, मंगनाळी ६१४, मसलगा ३४७, नागलगाव २८१, नंदनवन ६३०.नारनाळी १७५, नावंद्याचीवाडी १०९,रहाटी १४०, पानभोसी ३८४, पेठवडज १३२५, रूई २९३, संगुचीवाडी १४४, सावळेश्वर १६०, सावरगाव (नि़) ४५५, शेकापूर २३३, शेल्लाळी २६९, शिराढोण १६२३, शिरूर २६३, तेलंगवाडी १११, तेलूर १४४, उमरज १६८, उस्माननगर १६०८, वहाद २३९, येलूर १३६ अशा ९१ ग्रामपंचायतीतील २० हजार ३४७ कुटुंबांच्या नोंदीना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे़ ३६ हजारांपेक्षा जास्त कुटुंबाकडे २०१२ च्या सर्व्हेक्षणात शौचालय नसल्याचे समोर आले आहे़ गत दीड वर्षांत विविध योजनेतून काही शौचालये बांधकामे झाली असली तरी निर्मल भारत योजनेतून तालुका निर्मल करण्याचे मोठे आव्हान आहे़ (वार्ताहर)महिला बचत गट जेथे उपलब्ध असतील त्या गावात बचत गटाने व जेथे बचत गट नसतील तेथे ग्रामपंचायत तत्सम कर्मचाऱ्यांनी ११६ ग्रामपंचायतीत शौचालय उपलब्धतेविषयी पायाभूत सर्व्हेक्षण करण्यात आले़ तीन स्तरावर शौचालय व्याप्ती सुनिश्चित करण्याचा उदेश होता़ ग्रा़पं़, पं़स़ व जि़प़ सदस्य, कर्मचारी व नागरिक असे स्तर होते़ शासनाने एकूण आकडेवारीनुसार उपाययोजना सुरू केल्या़ शौचालय उपलब्ध नसणाऱ्यांना व पायाभूत सर्व्हेक्षणात नोंदणी असणाऱ्यांना विधवा-परितक्त्या, अल्पसंख्यांक, महिला कुटुंब प्रधान, अपंग, अल्पभूधारक आदी लाभार्थी योजनेस पात्र राहणार आहेत़ त्यासाठी आॅनलाईन नोंदी केल्या जात आहेत़