शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

नवीन आर्थिक वर्षापासून प्रत्येक निवासी मालमत्ताधारकाला ३६५ रुपये उपभोक्ता कर

By मुजीब देवणीकर | Updated: February 22, 2024 12:15 IST

महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून मालमत्तांना भाडे मूल्याधारित कर (रेंटल व्हॅल्यू बेसड् टॅक्स) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला आर्थिकरीत्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवीन आर्थिक वर्षापासून प्रत्येक निवासी मालमत्ताधारकाला ३६५ रुपये उपभोक्ता कर द्यावा लागणार आहे. ५० बेडपेक्षा मोठ्या हॉस्पिटलला सात हजार ३०० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. मेडिकल वेस्टशिवाय अन्य कचरा जमा करण्यासाठी हे शुल्क लावण्यात येत आहे.

महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून मालमत्तांना भाडे मूल्याधारित कर (रेंटल व्हॅल्यू बेसड् टॅक्स) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त नव्याने कर लागणाऱ्या मालमत्तांसाठी असून, अंमलबजावणी एक एप्रिलपासून केली जाणार आहे. नव्या दरानुसार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना ५ हजार ९४१ रुपये तर तेवढ्याच क्षेत्रफळाच्या व्यावसायिक मालमत्तांना आता ३१ हजार ९२४ रुपये आकारला जाईल. ही करवाढ करताना जुन्या मालमत्तांना दिलासा देण्यात आला असला तरी यंदापासून महापालिका उपभोक्ता कराची अंमलबजावणी करणार आहे. उपभोक्ता कर लावण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतलेला आहे, पण व्यापाऱ्यांचा वाढता विरोध पाहता त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सुमारे अडीच लाख मालमत्ताधारकांना ३६५ रुपये जास्तीचा कर भरावा लागणार आहे.

धनादेश वटला नाही तर दंडमहापालिकेला मालमत्ताधारकाने दिलेला धनादेश वटला नाही, तर रकमेच्या आधारावर दंड आकारला जात होता. पण यापुढे सरसकट पाच हजार रुपये दंड लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एखाद्याने दिलेले दोन हजारांचा धनादेश वटला नाही तर पाच हजार दंडासह नंतर त्यांना सात हजार रुपये द्यावे लागतील. सोबतच १३८ ची कारवाईदेखील होईल. धनादेशावर खाडाखोड असल्यास कर्मचाऱ्यावर दोनशे रुपये दंडात्मक कारवाई होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर