औरंगाबाद : आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेव स्वीकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे व्याज न देता सुमारे ३६ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविला.संतोष सदाशिव दाते, सौरभ संतोष दाते आणि एक महिला (सर्व रा. न्यू एसबीएच कॉलनी, उस्मानपुरा) विरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपींनी शुभसन पॉवर प्रा. लि. आणि पॉवर इन्फ्रा प्रा. लि. अशा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून तक्रारदार शेषराव नारायण माहोरकर आणि अन्य गुंतवणूकदारांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले. आकर्षक परतावा देण्याचे आमिष त्यांनी गुंतवणूकदारांना दाखविले. यामुळे शेषराव यांच्यासह इतरांनी आरोपीच्या कंपनीत ३० लाख ३० हजार रुपये गुंंतविले. मुदत संपल्यानंतरही तक्रारदार आणि अन्य गुंतवणूकदार ५ लाख ८४ हजार रुपये व्याजाची मागणी करण्यासाठी आरोपींकडे गेले. मात्र आरोपींनी त्यांना ठरल्यानुसार व्याज देण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे तक्रारदारांनी त्यांना मुद्दल रक्कम परत करण्यास सांगितले असता त्यांनी ही रक्कमही देण्यास टाळाटाळ केली. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सानप तपास करीत आहेत.--------
आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली ३६ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:36 IST
आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेव स्वीकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे व्याज न देता सुमारे ३६ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली ३६ लाखांची फसवणूक
ठळक मुद्देउस्मानपुरा पोलीस : ५जणांविरुद्ध गुन्हा