शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

३५ तंटामुक्त गावांचा अहवाल केला सादर

By admin | Updated: July 31, 2014 01:23 IST

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सुरू असून ५६५ पैकी ५१९ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले.

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सुरू असून ५६५ पैकी ५१९ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले. २०१४-१५ या वर्षात ४६ पैकी ३५ गावे जिल्हा मूल्यमापनात पात्र ठरली आहेत. जिल्ह्यांतर्गत मूल्यमापनाचा अहवाल पोलीस महासंचालकांसह गृहमंत्रालयास सादर करण्यात आला असून आता जिल्हा बाह्य मूल्यमापन समिती तपासणीसाठी कधी येणार? याची वाट पहावी लागत आहेतमहाराष्ट्रात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली होती. २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात थोडा बदल झाला. २०१४-१५ या वर्षातील तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी तालुकानिहाय समित्यांचे गठन करण्यात आले होते. या समित्यांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे ५ जून ते ५ जुलै या कालावधीत मूल्यमापन केले. त्याचा अहवाल नुकताच गृह मंत्रालयासह पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला. आता १५ आॅगस्टपर्यंत बाह्यमूल्यमापन समितीकडून तंटामुक्त गावांची तपासणी करण्यात येणार आहे. ही समिती हिंगोली जिल्ह्यात कधी येते, याकडे तंटामुक्ती स्पर्धेत सहभागी गावांवे लक्ष लागले आहे. मूल्यमापनामध्ये पात्र झालेली गावे पहेणी, घोटा, रिधोरा, जांभरूण खु.रोडगे, पुसेगाव, वाकोडी, औंढा, गुंज, गोरेगाव, हाताळा, चौंढी ही ११ गावे मोहिमेत सहभागी होऊनही यंदा त्यांचे मूल्यमापन झाले नाही.शिवणी बु., धानोरा बु., भानखेडा, उटी पुर्णा, येलदरी, कवरदरी, तांदुळवाडी, वडहिवरा, बोरखेडी पी, सेनगाव, शिवणी खु., कानरखेडा खु., गारखेडा, पळशी, हिंगोली ग्रामीण हद्दीतील खंडाळा, माळसेलू, आडगाव, वडद, पांगरी, राहोली बु., सावा, मालवाडी, लोहगाव, लिंबाळा मक्ता, चिंचोली, इसापूर रमणा, सिरसम बु., भटसावंगी, पळसोना, सावरगाव बंगला, दुर्गसावंगी, भटसावंगी तांडा, वारंगा मसाई, निशाना, वसई