शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुस-याचा भूखंड विक्री करून ३५ लाखाची फसवणुक, दाम्पत्यासह एजंटाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 19:05 IST

स्वत:च्या मालकीचा भूखंड असल्याचे खोटे सांगून एका एजंटामार्फत दोन जणांनी एका व्यापाºयास एमजीएम परिसरातील सुमारे साडेपाच हजार चौरस फुटाचा भूखंड विक्री करून ३५ लाखाचा गंडा घातल्याचे समोर आले.

औरंगाबाद, दि. ६ : स्वत:च्या मालकीचा भूखंड असल्याचे खोटे सांगून एका एजंटामार्फत दोन जणांनी एका व्यापाºयास एमजीएम परिसरातील सुमारे साडेपाच हजार चौरस फुटाचा भूखंड विक्री करून ३५ लाखाचा गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे या व्यवहारानंतर आरोपींनी पुन्हा तोच भूखंड एका डॉक्टरला विक्री करून त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्ह्याची यापूर्वी नोंद झालेली आहे.

सुधाकर गंगाधर उदावंत,सरलादेवी सुधाकर उदावंत आणि एजंट संतोष काशीनाथ पावटेकर अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २००८ ते २०१७ या कालावधीत ही फसवणुक झाली.  तक्रारदार प्रकाश जगन्नाथ राणा (रा.विजयनगर)यांनी याविषयी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार २००८ मध्ये त्यांना भूखंड खरेदी करायचा होता. तेव्हा एजंअ संतोष पावटेकर हा त्यांना भेटला.यावेळी त्याने आरोपी सुधाकर उदावंत आणि सरलादेवी उदावंत यांच्या मालकीचा सिटी सर्वे नंबर १२४७६ मधील ७५ नंबरचा भूखंड विक्रीला असून त्याचे क्षेत्रफळ ५ हजार ४७६ चौरस फुट आहे. 

यावेळी आरोपी उदावंत दाम्पत्यानेही त्यांचा भूखंड  निर्विवाद असल्याचे विश्वासाने सांगितले आणि त्या भूखंडाच्या मालकीहक्काची बनावट कागदपत्रे त्यांना दाखविले. तक्रारदार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ३५ लाखात हा भूखंड खरेदी केला. याबाबतचे नोटरी खरेदीखत त्यांनी केले.  नंतर हा भूखंड वादात असल्याचे समजले. वादामुळे भूखंडाची रजिस्ट्री होत  नसल्याने तक्रारदार आणि आरोपी यांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करीत असल्याचा करारनामा केला. मात्र तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी त्यांना त्यांचे ३५ लाख रुपये परत केले नाही. आरोपींनी आपली जाणूनबुजून आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार त्यांनी मुकुंदवाडी ठाण्यात नोंदविली.

हृदयरोगतज्ज्ञाचीही फसवणुकआरोपी उदावंत दाम्पत्य हे सराफ्यात राहते. त्यांनी २०१६ मध्ये हाच भूखंड हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत उदगिरे यांना विक्र ी करून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. इसारपावतीपोटी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतल्यानंतर आरोपी गायब झाले. डॉक्टरांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी त्यांना विक्री केलेला भूखंडाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले. त्यांनी आरोपींना पैशाची मागणी केली असता त्यांना त्यांची रक्कमही त्याने परत केली नाही. यामुळे त्यांनीही पोलिसांत तक्रार नोंदविली.