शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

३२ वर्षांत सेनेकडे महापौरपद १४ वेळा, तर भाजपकडे ४ वेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:17 IST

शहरात कुणी काय केले यावरून सध्या जोरदार राजकारण पेटले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसला ३ वेळा मिळाली संधी न्यायालयाच्या निर्णयामुळे एका अपक्षाला मिळाला पदाचा बहुमान

औरंगाबाद : महापालिकेची स्थापना ८ डिसेंबर १९८२ रोजी झाली; परंतु पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९८८ साली झाल्या. पालिकेचा पहिला महापौर म्हणून काँग्रेसचे शांताराम काळे यांना संधी मिळाली. ३२ वर्षांच्या काळात सर्व मिळून २२ महापौर शहराने पाहिले. यामध्ये १४ वेळा शिवसेनेकडे महापौरपद राहिले, तर ४ वेळा भाजपला महापौरपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली. ३ वेळा काँग्रेस, तर एकदा शिवसेना-भाजपच्या मदतीने अपक्ष नगरसेवकाला महापौरपदावर विराजमान होण्याचे भाग्य लाभले. 

कुणाच्या काळात कोणती कामे झाली. कोणत्या सत्ताधारी पक्षाने या शहराला अविस्मरणीय अशी सार्वजनिक योजना देऊन ती पूर्णत्वास नेण्यासाठी परिश्रम घेतले, याचे मूल्यांकन येणाऱ्या निवडणुकीत मतदार निश्चितच करतील; परंतु कुणी काय केले यावरून सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. ३२ वर्षांत ७ महिला महापौर झाल्या. यामध्ये सहा शिवसेनेच्या, तर एका भाजपच्या महापौराचा समावेश होता. आजवरच्या तीन दशकांचा धांडोळा घेतला, तर शिवसेना आणि भाजपकडेच सर्वाधिक महापौर, उपमहापौर पदे गेली आहेत. ज्यावेळी शिवसेनेचा महापौर, त्यावेळी भाजपचा उपमहापौर, असे समीकरण सत्तेत्त ठरलेले होते. 

नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे पालिकेतही भाजपने उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. सध्या दोन्ही पदांवर शिवसेनेचे नगरसेवक आहेत. पालिकेचा तीन दशकांचा इतिहास पाहिला तर शिवसेनेला महापौरपदाचा जास्त वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्या तुलनेत भाजप, काँग्रेसच्या वाट्याला कमी कालावधी आला. 

शिवसेनेचे आजवर झालेले महापौर : मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, सुनंदा कोल्हे, गजानन बारवाल, शीला गुंजाळ, सुदाम सोनवणे, विकास जैन, विमल राजपूत, रुक्मिणी शिंदे, किशनचंद तनवाणी, अनिता घोडेले, कला ओझा, त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले (विद्यमान महापौर).

भाजपचे झालेले महापौर : डॉ. भागवत कराड (दोन वेळा संधी मिळाली), विजया रहाटकर, भगवान घडामोडे.इतर पक्षांचे महापौर : अब्दुल रशीद खान (मामू).काँग्रेस पक्षाला मिळालेली संधी : डॉ. शांताराम काळे, मनमोहनसिंग ओबेरॉय, अशोक सायन्ना.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना